T20 World Cup आधी भारताचा बांगलादेशविरूद्ध 'सराव', पाकिस्तानचा सामना नाही, कारण...

आयसीसीने सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून पाकिस्तानचा एकही सामना होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:34 PM2024-05-17T13:34:06+5:302024-05-17T13:35:30+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 Warm-Up Match schedule India will play their warm up match against Bangladesh on 1st June | T20 World Cup आधी भारताचा बांगलादेशविरूद्ध 'सराव', पाकिस्तानचा सामना नाही, कारण...

T20 World Cup आधी भारताचा बांगलादेशविरूद्ध 'सराव', पाकिस्तानचा सामना नाही, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 Warm-Up Match : २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळणार आहे. आयसीसीने सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून पाकिस्तानचा एकही सामना होणार नाही. शेजारील देश थेट भारताविरूद्ध ९ तारखेला सामना खेळेल. विश्वचषकाआधी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० मालिका होत असल्याने हे संघ सराव सामने खेळणार नाहीत. २७ मे पासून सराव सामने खेळवले जातील. यातील सलामीचा सामना कॅनडा आणि नेपाळ यांच्यात होईल. भारतीय संघ अमेरिकेत १ जून रोजी बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळेल. 

पाकिस्तानी संघ मायदेशात ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडविरूद्ध चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिकाच दोन्हीही संघांसाठी विश्वचषकाची तयारी असेल यात शंका नाही. २२ मे ते ३० तारखेदरम्यान पाकिस्तान-इंग्लंड मालिका पार पडेल, तर २७ ते १ जूनदरम्यान विश्वचषकाचे सराव सामने खेळवले जातील. द्विपक्षीय मालिकेमुळे पाकिस्तान आणि इंग्लंड यांना एकही सराव सामना खेळता येणार नाही. 

ट्वेंटी-२० विश्वचषकातील सराव सामने -
२७ मे -

कॅनडा विरूद्ध नेपाळ 
ओमान विरूद्ध पापुआ न्यूगिनी 
नामिबिया विरूद्ध युंगाडा

२८ मे -
श्रीलंका विरूद्ध नेदरलँड्स 
बांगलादेश विरूद्ध अमेरिका 
ऑस्ट्रेलिया विरूद्ध नामिबिया

२९ मे -
दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंट्रा-स्क्वाड
अफगाणिस्तान विरूद्ध ओमान
 
३० मे -
नेपाळ विरूद्ध अमेरिका
स्कॉटलंड विरूद्ध युगांडा
नेदलँड्स विरूद्ध कॅनडा
नामिबिया विरूद्ध पापुआ न्यू गिनी
वेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया

३१ मे -
आयर्लंड विरूद्ध श्रीलंका 
स्कॉटलंड विरूद्ध अफगाणिस्तान

१ जून -
बांगलादेश विरूद्ध भारत 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - 
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

Web Title: T20 World Cup 2024 Warm-Up Match schedule India will play their warm up match against Bangladesh on 1st June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.