David Warner Liam Livingstone, IPL 2022 PBKS vs DC: पंजाबचा 'मास्टरप्लॅन' अन् मॅचच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नर झाला बाद! लियम लिव्हिंगस्टोनने काढली विकेट, पाहा Video

वॉर्नरने स्वत:हून मागून घेतली होती स्ट्राईक पण पहिल्या बॉलवर गेला माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 08:21 PM2022-05-16T20:21:10+5:302022-05-16T20:21:38+5:30

whatsapp join usJoin us
David Warner gets out on first ball of the match as Punjab Kings Masterplan works to open bowling with part time spinner Liam Livingstone IPL 2022 | David Warner Liam Livingstone, IPL 2022 PBKS vs DC: पंजाबचा 'मास्टरप्लॅन' अन् मॅचच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नर झाला बाद! लियम लिव्हिंगस्टोनने काढली विकेट, पाहा Video

David Warner Liam Livingstone, IPL 2022 PBKS vs DC: पंजाबचा 'मास्टरप्लॅन' अन् मॅचच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नर झाला बाद! लियम लिव्हिंगस्टोनने काढली विकेट, पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

David Warner Liam Livingstone, IPL 2022 PBKS vs DC: पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मयंक अग्रवालने टॉस जिंकून दिल्ली प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दिल्लीच्या संघाने दोन बदल करत सरफराज खान आणि खलील अहमद या दोघांना संघात स्थान दिले. पंजाबने मात्र संघात बदल केला नाही. याऊलट पंजाबचा संघ एका मास्टरप्लॅन सह मैदानात उतरला आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याचं फळ त्यांना मिळालं.

दिल्लीचा दमदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि सरफराज खान दोघे सलामीला उतरले. सरफराज स्ट्राईक घेत होता, पण वॉर्नरने त्याला स्ट्राईकवरून बाजूला करत स्वत: फलंदाजीसाठी सज्ज झाला. लिव्हिंगस्टोनने ठरल्याप्रमाणे आखूड टप्प्याचा आणि वॉर्नरपासून थोडासा दूर चेंडू टाकला. त्यात वॉर्नर फसला. पहिला चेंडू मारून सामना आपल्या दिशेने खेचण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटला कट लागून हवेत गेला आणि वॉर्नर पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पाहा Video-

दिल्लीचा संघ-डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, रिषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद

पंजाबचा संघ- जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

Web Title: David Warner gets out on first ball of the match as Punjab Kings Masterplan works to open bowling with part time spinner Liam Livingstone IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.