भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांना श्रद्धांजली वाहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:52 PM2022-01-04T15:52:10+5:302022-01-04T15:54:02+5:30

whatsapp join usJoin us
Corona in India: Former cricketer ambapratasinh Jadeja dies due to corona | भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट: कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने लहान-मोठे गरिब-श्रीमंत कोणाचीही गय केली नाही. मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता, पण पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यातच आता क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.

कोरोनामुळे भारताने एक माजी क्रिकेटपटू गमावला आहे. माजी क्रिकेटपटू अंबाप्रतसिंहजी जडेजा(69) यांचे मंगळवारी कोव्हिड-19 संसर्गामुळे निधन झाले. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (SCA) ही माहिती दिली. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने निवेदनात म्हटले की, 'सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील सर्वजण सौराष्ट्रचे माजी क्रिकेटपटू अंबाप्रतापसिंहजी जडेजा यांच्या निधनाने शोकग्रस्त आहेत. आज पहाटे वलसाड येथे कोविड-19 शी लढताना त्यांचे निधन झाले.'

कोण होते अंबाप्रतसिंहजी जडेजा
जामनगरचे रहिवासी असलेले अंबाप्रतापसिंहजी जडेजा हे मध्यमगती वेगवान गोलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज होते. रणजी ट्रॉफीमध्ये ते सौराष्ट्रकडून आठ सामने खेळले. क्रिकेटसोबतच ते गुजरात पोलिसांचे निवृत्त डीएसपी होते. जडेजांनी आठ रणजी सामन्यांमध्ये 11.11 च्या सरासरीने 100 धावा केल्या. गोलंदाजीत, त्यांनी 17 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. त्यांनी सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आठ रणजी सामने खेळले.

कोरोनाने घेतला जीव

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, 'अंबप्रतापसिंहजी हे एक अद्भुत खेळाडू होते. मी त्यांच्याशी क्रिकेटवर अनेकदा चर्चा करायचो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.' गेल्या वर्षीही अनेक वर्तमान आणि माजी क्रिकेटपटूंचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामध्ये राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा 36 वर्षीय लेगस्पिनर विवेक यादवचा  5 मे 2021 रोजी जयपूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. विवेक 2010-11 आणि 2011-12 हंगामात रणजी करंडक जिंकणाऱ्या राजस्थान संघाचा सदस्य होता. त्याने 2008 ते 2013 दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 57 बळी घेतले.
 

Web Title: Corona in India: Former cricketer ambapratasinh Jadeja dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.