corona virus: Ranji cricketers take a part in blood donation camp in vasai virar | Corona Virus News : खेळाडू बनले योद्धे!; कोरोनाविरोधात रणजी क्रिकेटपटू उतरले मैदानात 

Corona Virus News : खेळाडू बनले योद्धे!; कोरोनाविरोधात रणजी क्रिकेटपटू उतरले मैदानात 

कोरोनाशी सुरू असलेला सामना जिंकण्यासाठी वसई-विरारमध्ये सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात थेट रणजी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे  त्यांच्या सहभागामुळे नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण असून भरभूर प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 91 खेळाडूंनी रक्तदान केलं आहे.

वर्ल्ड कप होणार नसेल, तर ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिका खेळण्यात अर्थ नाही - बीसीसीआय

विवा महाविद्यालय, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, अवर्स क्रिकेट क्लब यांनी जे. जे. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने वसई-विरारमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि अवर्स क्रिकेट क्लब या दोन्ही संस्था मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून तो भरून काढण्यासाठीच हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. यात विवा महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.

या रक्तदान शिबिरात वसई-विरार टप्प्यातील 90 पेक्षा जास्त खेळाडूंनी आपलं योगदान दिलं. यात विनायक भोईर आणि रॉयस्टन डियाझ या रणजी खेळाडूंचाही समावेश आहे. त्याशिवाय २५० पेक्षा जास्त कुटुंबांनी पुढे येत आपला वाटा उचचला आहे.  रक्तदान शिबीर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टंसिंगची पुरेपूर काळजी घेतल्याचं रक्तदात्यांनी सांगितलं. 

खेळाडूंबरोबरच विवा महाविद्यालयाचे खजिनदार शिखर ठाकूर, स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांनीही रक्तदान केलं. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही या शिबिरात सक्रीय सहभाग घेतला. 'कोरोनाच्या या कठीण प्रसंगात सगळेच आपापल्या परीने मदत करत आहेत. अशा वेळी वसई-विरारमधील MCAशी संलग्न असलेल्या या क्लबनी पुढाकार घेत या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, याचं आम्हाला कौतुक आहे,' असं मत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी व्यक्त केलं. 

MCAशी संलग्न असलेले क्लब अशा उपक्रमांमध्येही हिरहिरीने पुढाकार घेतात ही बाब आमच्यासाठी खरंच अभिमानाची आहे, अशी प्रतिक्रिया MCAचे अपेक्स कौन्सिल मेंबर अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केली. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona virus: Ranji cricketers take a part in blood donation camp in vasai virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.