vicky kaushal : आधी सलमानची गर्लफ्रेंड हिसकावली आणि आता..., विकी कौशलची युजर्सनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:57 PM2022-05-05T17:57:19+5:302022-05-05T17:58:52+5:30

Vicky Kaushal : सध्या विकीची नवी जाहिरात चर्चेत आहे.  या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आणि  वेगळीच चर्चा रंगली. होय, नेटकऱ्यांना अचानक भाईजान आठवला.

vicky kaushal thums up charged ad users had fun | vicky kaushal : आधी सलमानची गर्लफ्रेंड हिसकावली आणि आता..., विकी कौशलची युजर्सनी घेतली मजा

vicky kaushal : आधी सलमानची गर्लफ्रेंड हिसकावली आणि आता..., विकी कौशलची युजर्सनी घेतली मजा

googlenewsNext

विकी कौशल ( Vicky Kaushal ) सध्या जोरात आहे. चित्रपटांसोबतही मोठ मोठ्या बँडच्या जाहिरातींत विकी दिसतोय. सध्या विकीची नवी जाहिरात चर्चेत आहे.  या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आणि  वेगळीच चर्चा रंगली. होय, नेटकऱ्यांना अचानक भाईजान आठवला. ( Vicky Kaushal Charged Ad )

विकीने थम्स अप ब्रँडच्या ‘चार्ज्ड’ या नव्या ड्रिंकची जाहिरात केली आहे. या जाहिरातीत विकी व्हाईट टी-शर्ट व ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट प्रिंटेड हुडीत दिसतो. चार्जर दियो, असं तो म्हणतो आणि कुणीतरी त्याच्याकडे लाल रंगाची ड्रिंक फेकतो. ती कॅच करत विकी ती पोटात रिचवतो. जाहिरात ‘तुफानी’ आहेच. पण त्यापेक्षा या जाहिरातीवरच्या युजर्सच्या कमेंट्स लक्षवेधी आहेत.

होय, ही जाहिरात समोर येताच अनेकजण विकीची मजा घेताना दिसत आहेत. ‘सलमानची गर्लफे्रन्ड हिसकावली, आता त्याची अ‍ॅड सुद्धा हडपली, वाह क्या बात है,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. युजरचा इशारा सलमानची थम्स अपची जाहिरात आणि कतरिना कैफकडे आहे. विकीच्या चार्ज्डची अ‍ॅड सलमानच्या अ‍ॅडपेक्षा एकदम वेगळी आहे. पण यानिमित्ताने युजर्सला विकीची मजा घेण्याची संधी मिळालीये, हे नक्की.

विकीने डिसेंबर 2021 मध्ये कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नात विकी  व कतरिनाचे कुटुंबीय व मोजके मित्रमंडळी तेवढेच हजर होते. विकी व कतरिना 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. त्याआधी कतरिना सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
विकीच्या वर्कफं्रटबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘इम्मॉर्टल अश्वत्थामा’ आणि मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्येही त्याची वर्णी लागली आहे. कतरिना कैफ ही लवकरच सलमानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: vicky kaushal thums up charged ad users had fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.