तुम बिन फेम संदली सिन्हा आज आहे कोट्यवधीची मालकीण, बॉलिवूड अभिनेत्री इतकेच कमावते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:00 AM2020-01-12T11:00:00+5:302020-01-12T11:00:02+5:30

संदलीला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश न मिळाल्याने ती अभिनयक्षेत्रापासून दूर गेली.

'Tum Bin' actress sandali sinha Then and Now | तुम बिन फेम संदली सिन्हा आज आहे कोट्यवधीची मालकीण, बॉलिवूड अभिनेत्री इतकेच कमावते पैसे

तुम बिन फेम संदली सिन्हा आज आहे कोट्यवधीची मालकीण, बॉलिवूड अभिनेत्री इतकेच कमावते पैसे

googlenewsNext
ठळक मुद्देसंदली बॉलिवूडपासून दूर तिच्या खाजगी आयुष्यात सध्या प्रचंड खूश आहे. २००५ साली तिने बिझनेसमन किरण सालस्करसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.

तुम बिन हा चित्रपट २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाची कथा, व्यक्तिरेखा सगळेच प्रेक्षकांना भावले होते. विशेष म्हणजे या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात संदली सिन्हाला आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. हा चित्रपट तिचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमधील एक हिट अभिनेत्री बनेल असे अनेकांना वाटले होते. पण या चित्रपटानंतर ती केवळ पिंजर, ओम, अब तुम्हारे हवाले वतन साथियो यांसारख्या काहीच चित्रपटांमध्ये झळकली. तिला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश न मिळाल्याने ती अभिनयक्षेत्रापासून दूर गेली.



संदली सिन्हाचा काल म्हणजेच 11 जानेवारीला वाढदिवस होता. संदलीचे वडील एअर फोर्समध्ये होते. पण देशाची सेवा करत असताना त्यांचे निधन झाले. तिच्या आईनेच तिला आणि तिच्या भावंडांना लहानाचे मोठे केले. संदली लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण तिने एका फॅशन शोमध्ये काम केले आणि ती मॉडलिंगकडे वळली.



मॉडलिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी संदलीने मुंबईतच स्थायिक व्हायचे ठरवले. तिच्या सौंदर्यामुळे खूपच कमी कालावधीत ती एक प्रसिद्ध मॉडेल बनली. मॉडलिंग करत असतानाच सोनू निगमच्या दिवाना या अल्बममध्ये तिला झळकण्याची संधी मिळाली. या अल्बमचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले होते. त्याच अल्बममुळे अनुभव सिन्हाने दिग्दर्शित केलेल्या तुम बिन या चित्रपटात त्याने मुख्य भूमिकेसाठी तिची निवड केली.



संदली बॉलिवूडपासून दूर तिच्या खाजगी आयुष्यात सध्या प्रचंड खूश आहे. २००५ साली तिने बिझनेसमन किरण सालस्करसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. झगमगत्या दुनियेपासून लांब जात सध्या ती आपल्या कुटुंबासह आयुष्य एन्जॉय करत आहे. संदलीला दोन मुलंही आहेत. सिनेमात झळकत नसली तरी संदली कोट्यावधीची मालकीण आहे. ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ ही देशातील सर्वात मोठी बेकरी असून या बेकरीची ती मालकीण आहे. ती आता फक्त बिझनेसवरच लक्ष केंद्रित करत आहे.

 

Web Title: 'Tum Bin' actress sandali sinha Then and Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.