Taapsee Pannu takes a jibe on news channels for holding the entertainment fort | तापसी पन्नूने 'त्या' न्यूज चॅनलची उडवली खिल्ली, मनोरंजन करण्यासाठी मानले आभार....

तापसी पन्नूने 'त्या' न्यूज चॅनलची उडवली खिल्ली, मनोरंजन करण्यासाठी मानले आभार....

अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्विट करत न्यूजच्या नावावर काहीही दाखवणाऱ्या काही न्यूज चॅनल्सची खिल्ली उडवली आहे. तापसी अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात थिएटर उघडण्याची परवानगी मिळाल्याबाबत सांगत म्हणाली की, आता काही न्यूज चॅनल्सकडून आशा केली जाऊ शकते की, ते त्यांचा फोकस आता मनोरंजन करण्याऐवजी खऱ्या न्यूज दाखवण्यावर करतील.

तापसीने ट्विटमध्ये लिहिले की, 'आता थिएटर ५० टक्के क्षमतेसोबत सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे काही 'न्यूज' चॅनल्सकडून आशा आहे की, ते आता ५० टक्क्यांपेक्षा जास्त लक्ष वास्तविक न्यूज दाखवण्यावर देतील. धन्यवाद मित्रांनो, लॉकडॉऊन दरम्यान आमच्याऐवजी तुम्हीच लोकांचं मनोरंजन केलं. आता ते काम आम्ही सांभाळतो. #SharingCaring'. ( तापसी पन्नू म्हणाली - 'जर अनुराग कश्यप लैंगिक अत्याचारात दोषी आढळला तर....')

या ट्विटच्या थोड्या वेळातच तापनी दुसरं ट्विट करत एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात खूप दिवसांपासून सुशांतच्या मृत्यूला हत्या सिद्ध करण्यामागे लागलेल्या एका न्यूज चॅनलची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडीओ शेअर करत तापसीने लिहिले की, 'फक्त विचारतो, उत्तर ऐकत नाही'. (तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली)

'जनते'च्या डिमांडवर डान्स

याआधी तापसीने तिच्या इन्स्टाग्राम वॉलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती 'मुखड़ा देख के मर गया नीं' या पंजाबी गाण्यात डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले होते की, 'हे  जनतेच्या डिमांडवर... ही जनता म्हणजे पन्नू परिवारातील लोक आहेत. तुम्ही जे गाणं ऐकत मोठे होत असता ते नेहमी खास असतं'. (सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न)

अनुरागला सपोर्ट

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. यानंतर तापसी अनुरागच्या सपोर्टसाठी समोर आली होती. तिने लिहिले होते की, 'तुझ्यासाठी माझ्या मित्रा, तू एक सर्वात मोठा फेमिनिस्ट आहे. ज्याला मी ओळखते. तुझ्या नव्या सिनेमातून जगाला समजेल की, तुझ्या विश्वातील महिला किती शक्तिशाली आणि महत्वपूर्ण असतात'.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taapsee Pannu takes a jibe on news channels for holding the entertainment fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.