If Anurag Kashyap is found guilty then i shall will break all ties with him says Taapsee Pannu | तापसी पन्नू म्हणाली - 'जर अनुराग कश्यप लैंगिक अत्याचारात दोषी आढळला तर....'

तापसी पन्नू म्हणाली - 'जर अनुराग कश्यप लैंगिक अत्याचारात दोषी आढळला तर....'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता-अभिनेता-लेखक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक शोषणाचाा आरोप लावलाय. अनुरागवरील या आरोपांनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टसाठी समोर आले आहेत. तापसी पन्नूने सर्वात आधी त्याच्या सपोर्टमध्ये पोस्ट केली होती.  अनुराग हा सर्वात मोठा फेमिनिस्ट असल्याचं तापसी म्हणाली होती. आता तर तापसी म्हणाली की, अनुराग महिलांचा खूप सन्मान करतो आणि तरी सुद्धा तो लैंगिक शोषणात दोषी आढळला तर ती त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडेन.

तापसी मुंबई मिररसोबत बोलताना सांगितले की, अनुराग कधीही कोणत्याही व्यक्तीबाबत वाईट बोलला नाही. तापसी म्हणाली की,  अनुरागच्या सेट्सवर अनेक महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करतात जे इतर ठिकाणी फार कमी बघायलं मिळतं. ती म्हणाली की, जर एखाद्या व्यक्तीचं शोषण झालं असेल तर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जे सत्य असेल ते समोर येईल.

याबाबत तापसी पुढे म्हणाली की, जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर ती पहिली व्यक्ती असेल जी त्याच्यासोबत सगळे संबंध तोडेल. इतकेच नाही तर असंही म्हणाली की, मीटू मुव्हमेंटला अशाप्रकार वेगळं वळण देणं महिलांसाठी ठीक नाही. दरम्यान याआधी तापसी पन्नूने अनुराग कश्यपच्या सपोर्टमध्ये पोस्ट लिहिली होती की, 'तुझ्यासाठी माझ्या मित्रा...मला माहीत आहे तू सर्वात मोठा फेमिनिस्ट आहे. तुझ्या आणखी एका नव्या आर्ट पीससोबत सेटवर पुन्हा लवकरच भेट होईल. ज्यात दाखवलं जातं की, तू तयार करत असलेल्या विश्वातील महिला किती शक्तिशाली आणि सार्थक असतात'.

अभिनेत्री पायल घोषणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केला होता की, अनुराग कश्यपने २०१५ मध्ये तिला त्याच्या घरी बोलवून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पायलने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये अनुराग विरोधात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे अनुरागने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

राजश्री देशपांडेचा अनुरागला सपोर्ट

आता अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने अनुरागवर लैंगिक गैरतर्वनाचा आरोप करणा-या पायल घोषच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे. अनुराग खरोखर दोषी असेल तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल. मात्र मीटूच्या नावावर खोटे आरोप या मोहिमेची धार नक्कीच कमी करतील, असे राजश्रीने म्हटले आहे. राजश्री देशपांडेने अनुरागसोबत ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘चोक्ड’मध्ये काम केले आहे. राजश्रीने अनुरागला पाठींबा देत एकपाठोपाठ एक अनेक ट्विट केलेत़.

काय म्हणाली राजश्री..

डियर पायल घोष, मी अनुरागसोबत दोन प्रोजेक्टमध्ये काम केलेय, म्हणून हे लिहित नाहीये. मी हे लिहितेय कारण मला खरोखर तुझे म्हणणे ऐकून घ्यायचे आहे. अभिनेत्री असण्यासोबतच गेल्या 8 वर्षांपासून मी भारताच्या ग्रामीण भागात काम करतेय. अनेक पीडित महिलांसोबत मी काम केले आहे. मीटू ही मोहिमेने जगभरातील महिलांना आवाज दिला. अनुरागने काही वाईट केले असेलच तर व्यवस्था त्याला शिक्षा देईलच़ पण खोट्या आरोपांनी मीटू सारख्या मोहिमेला नख लागायला नको. 

हे पण वाचा :

अनुराग दोषी असेल तर...; राजश्री देशपांडेने पायल घोषला लिहिले खुले पत्र

अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

अनुराग कश्यपच्या सपोर्टसाठी समोर आली राधिका आपटे, म्हणाली - 'तुझ्यासोबत नेहमीच सुरक्षित वाटलं'

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: If Anurag Kashyap is found guilty then i shall will break all ties with him says Taapsee Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.