Rajshri Deshpande pens open letter to Payal Ghosh over sexual harassment allegation against Anurag Kashyap | अनुराग दोषी असेल तर...; राजश्री देशपांडेने पायल घोषला लिहिले खुले पत्र

अनुराग दोषी असेल तर...; राजश्री देशपांडेने पायल घोषला लिहिले खुले पत्र

ठळक मुद्देराजश्रीने 2012 सानी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना अनेकजण अनुरागला पाठींबा देत आहेत. आता अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने अनुरागवर लैंगिक गैरतर्वनाचा आरोप करणा-या पायल घोषच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे. अनुराग खरोखर दोषी असेल तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल. मात्र मीटूच्या नावावर खोटे आरोप या मोहिमेची धार नक्कीच कमी करतील, असे राजश्रीने म्हटले आहे.
राजश्री देशपांडेने अनुरागसोबत ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘चोक्ड’मध्ये काम केले आहे. राजश्रीने अनुरागला पाठींबा देत एकपाठोपाठ एक अनेक ट्विट केलेत़.

काय म्हणाली राजश्री,
डियर पायल घोष, मी अनुरागसोबत दोन प्रोजेक्टमध्ये काम केलेय, म्हणून हे लिहित नाहीये. मी हे लिहितेय कारण मला खरोखर तुझे म्हणणे ऐकून घ्यायचे आहे. अभिनेत्री असण्यासोबतच गेल्या 8 वर्षांपासून मी भारताच्या ग्रामीण भागात काम करतेय. अनेक पीडित महिलांसोबत मी काम केले आहे. मीटू ही मोहिमेने जगभरातील महिलांना आवाज दिला. अनुरागने काही वाईट केले असेलच तर व्यवस्था त्याला शिक्षा देईलच़ पण खोट्या आरोपांनी मीटू सारख्या मोहिमेला नख लागायला नको. 

 खोट्या आरोपांनी मीटू सारखी मोहिम उद्धस्त होईल, अशी भीती मला आहे. पायल, मला तुझे म्हणणे ऐकायचे आहे. मला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे. स्वत:चा दावा सिद्ध करण्यासाठी अन्य महिलांच्या नावाचा वापर करण्यास तुला संकोच वाटला नाही का? हे अपमानास्पद आहे, हे तुला वाटत नाहीये का? तुझ्यासोबत जे काही घडले, त्या अनुभवाचा तू 6 वर्षे कसा सामना केलास? हे मला जाणून घ्यायचे आहे. कारण छळ सहन करणे किती कठीण असते आणि ती घटना विसरणे सोपे नसते, हे मी जाणते. आशा आहे, माझ्या या प्रश्नांची उत्तरे तू देशील. लगेच नाही, पण कदाचित काही वर्षांनी. हेच सत्य आहे की या वर्तमान प्रभावशाली शर्यतीचा भाग आहे, हे कळेल तेव्हा तरी तू बोलशील, अशी मी आशा करते, असे राजश्रीने लिहिले आहे.

राजश्रीने 2012 सानी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आमिर खानच्या ‘तलाश’ सिनेमात तिला एक छोटी भूमिका मिळाली होती. त्यानंतर राजश्रीने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेत तिने काम केले.त्यानंतर पुन्हा राजश्री मोठ्या पडद्याकडे परतली. यावेळी तिला सलमान खानच्या ‘किक’ सिनेमात काम मिळाले. पण ही सुद्धा भूमिका लहान होती. पुढे तिने ‘हरम’ या मल्याळम सिनेमात काम केले. यात तिला डबल रोल साकारायला मिळाला. ‘सेक्रेड गेम्स’ मध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ‘सेक्रेड गेम्स’मधील तिचा न्यूड सीनमध्ये पाहून अनेकांना धक्काच बसला होता.

'सेक्रेड गेम्स'मध्ये न्यूड सीन देणारी राजश्री देशपांडेचे इन्स्टा Pic पाहून उडले तुमची झोप

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajshri Deshpande pens open letter to Payal Ghosh over sexual harassment allegation against Anurag Kashyap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.