ठळक मुद्देअनुराग व तापसी हे दोघे चांगले मित्र आहे. अनुरागसोबत तापसीने दोन सिनेमे केले आहेत. 

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने केलेल्या आरोपांनी खळबळ माजली असताना, अभिनेत्री तापसी पन्नू अनुरागच्या बाजूने मैदानात उतरली आणि ट्रोल झाली.
 पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे. अनुराग कश्यपने हे सर्व आरोप नाकारले आहेत. सोबत आता तापसीने अनुरागला पाठींबा दिला आहे. इन्स्टावर एक  पोस्ट लिहित तापसीने अनुरागची पाठराखण केली.

‘माझ्या मित्रा, मला माहित असलेल्यांपैकी तू सर्वांत मोठा स्त्रीवादी आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून स्पष्ट होणार आहे,’, अशी पोस्ट तपासीने केली.
अनुराग व तापसी हे दोघे चांगले मित्र आहे. अनुरागसोबत तापसीने दोन सिनेमे केले आहेत. अनुरागच्या मनमर्जिया आणि सांड की आंख या सिनेमात तापसी मुख्य भूमिकेत झळकली होती. यादरम्यान दोघांची मैत्री वाढली. यापूर्वीही अनेकदा तापसीने अनुरागचा सपोर्ट केला आहे.

पण झाली ट्रोल...
तापसीच्या या पोस्टने कदाचित अनुराग  सुखावला असेल पण नेटकरी मात्र बिथरले. या पोस्टनंतर तापसी  नेटक-यांच्या निशाण्यावर आली़ लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या व्यक्तिच्या बाजूने उभे राहणा-या तापसीला अनेकांनी अक्षरश: फैलावर घेतले़.

याद राख, भविष्यात तुझ्यासोबत अशी कुठली घटना घडली तर तू बोलू शकणार नाहीस. लोक हसतील तुझ्यावर, असे एका युजरने तिला सुनावले. तुझ्यासारखी सुमार अभिनेत्री अनुराग कश्यप आणि अनुभव सिन्हासोबतच का काम करते, यात काहीही आश्चर्य नाही.

 नव्या पिढीसाठी रोल मॉडेल म्हणून तुझ्यासारखी अभिनेत्री आम्हाला नको, असे एका युजरने तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले.
  
अनुरागने फेटाळले पायलचे आरोप
अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले.
थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले़ क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम़ मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे तो म्हणाला.

थोडी तर मर्यादा पाळा...! लैंगिक शोषणाच्या आरोपावर अनुराग कश्यप अखेर बोलला

 अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

 अभिनेत्री पायल घोषचे आरोप
‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तिमागील राक्षण देशाला पाहू दे. यामुळे माझे नुकसान होऊ शकते, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे़ कृपया मदत करा,’असे ट्विट पायलने केले होते.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पायलच्या या ट्विटची दखल घेतली आहे. पायलने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असे रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

कंगनाने केली अटकेची मागणी
अभिनेत्री कंगना राणौतने पल्लवी घोषचे ट्विट रिट्विट केले होते. ‘प्रत्येकाने उठवलेला आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला अटक व्हायला हवी,’ असे कंगनाने म्हटले होते.
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: taapsee pannu extends support to anurag kashyap amid metoo allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.