If Sushant Singh Rajput was alive he would have been put behind bars too asks Taapsee Pannu | सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न

सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर सामान्य लोकांसोबत अनेक सेलिब्रिटीही आपली मतं व्यक्त करत आहेत. अनेकजणांनी मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट केलाय. त्यांचं मत आहे की, ज्याप्रकारचा व्यवहार रियासोबत केला गेला, ते फार चुकीचं आहे. असं मत व्यक्त करणाऱ्यांमध्ये तापसी पन्नूचाही समावेश आहे.

अनेक दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीने रियाला अटक केली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं जिथे तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. रियाने चौकशीदरम्यान कबूल केलंय की, ती सुशांतला ड्रग्स देत होती, पण स्वत: तिने कधीही ड्रग्स घेतलं नाही.

तापसी काय म्हणाली?

रियाला अटक झाल्यावर अनेकांनी आपली वेगवेगळी मते व्यक्त केलीत. तापसीने पोस्टमध्ये लिहिले की, 'कनेक्शन! ती सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग करत होती. अशात जर सुशांत जिवंत असता तर तो तुरूंगात असता? ओह नो. त्यांनी ड्रग्ससाठी फोर्स केला असेल. सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय...हेच सत्य आहे. आपण करून दाखवलं'. तापसीचं हे मत कदाचित सुशांतच्या परिवाराला किंवा त्याच्या फॅन्सना आवडणार नाही. 

दरम्यान, रिमांड कॉपीमध्ये रियाला ड्रग सिंडिकेटचं अॅक्टिव मेंबर सांगण्यात आलंय. यानुसार, रियाने ड्रग्स घेत असल्याची बाब कबूल केलेली नाही. ती सुशांत सिंह राजपूतला ड्रग्स उपलब्ध करून देत होती आणि पेडलरच्या संपर्कात होती. सुशांतच्या सांगण्यावरून पेडलर्सना रियाने पैसे दिले होते.

कंगना काय म्हणाली?

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला NCB ने अटक केली. त्यावर अभिनेत्री कंगनाने तिची पाठराखण करत “मी नेहमी म्हणत आलेय की रिया फक्त बळीचा बकरा आहे, ती कदाचित ड्रगी असू शकते. परंतु आता तिने सुशांतच्या प्रकरणात अनेक पडद्यामागील मास्टरमाइन्डची नावे उघड केली पाहिजेत, ज्या सुशांतने आपली कारकीर्द संपविली? त्याचे चित्रपट कोणी घेतले? त्याची प्रतिष्ठा कुणामुळे बिघडली आणि त्याला ड्रग्ज कोट देत होतं? याबाबत तिने आता पर्दाफाश करावा अन्यथा आता उशीर होईल, अशी प्रतिक्रिया पिंकव्हिलाला दिली.

तसेच पुढे कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणाली की, इंडस्ट्रीतल्या विशेषाधिकारांमुळे आपल्याला काढून टाकण्यात आले, सुशांतच्या न्यायासाठी मागणी करणारी असलेल्या कंगनाने अप्रत्यक्षरित्या रियाची पाठराखण केली आहे. उद्या कंगना मुंबईत येणार असून तिचा आणि संजय राऊत यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अखेर अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रियाला दुपारी 3.45 वाजता अधिकृतपणे अटक करण्यात आली.

रियाचे वकील काय म्हणाले?

रियाच्या अटकेवर तिचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याने ग्रासलेल्या आणि ड्रग्ज सेवनाने आत्महत्या केलेल्या एका व्यसनाधीनतेच्या प्रेमात पडल्यामुळे तिला ही शिक्षा भोगावी लागली. ही न्यायाची विडंबना आहे. ती गेली अनेक वर्ष ५ प्रसिद्ध डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार करून घेत त्याची काळजी घेत होती.  एका महिलेच्या मागे तीन - तीन केंद्रीय संस्था तपासासाठी आहेत. 

हे पण वाचा:

या तीन कारणांमुळे NCB समोर रिया चक्रवर्तीचं पितळ पडलं उघडं, जाणून घ्या काय आहेत ती?

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रियाला अखेर अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: If Sushant Singh Rajput was alive he would have been put behind bars too asks Taapsee Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.