Sushant Singh Rajput case : सुशांत केसमध्ये चावीवाल्याने केला खुलासा, त्या रात्री नेमकं काय झालं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 13:24 IST2020-08-22T13:23:49+5:302020-08-22T13:24:01+5:30

सुशांत सिंह राजपूत केससंबंधी लोकांना विचारपूस केली जात आहे. अशातच चावीावाल्याचा जबाब समोर आला आहे. १४ जूनला हा सुशांतच्या घरी पोहोचला तेव्हा काय झालं हे त्याने सांगितले.

Sushant Singh Rajput case : Keymaker talks about some important details from that night | Sushant Singh Rajput case : सुशांत केसमध्ये चावीवाल्याने केला खुलासा, त्या रात्री नेमकं काय झालं होतं!

Sushant Singh Rajput case : सुशांत केसमध्ये चावीवाल्याने केला खुलासा, त्या रात्री नेमकं काय झालं होतं!

अखेर मोठ्या लढाईनंतर सुशांत सिंह राजपूतची केस आता सीबीआयकडे आली असून सीबीआयने तपासाला सुरूवात केली आहे. एजन्सीने १५ लोकांच्या ५ टीम तयार केल्या आहेत. तसेच केससंबंधी लोकांना विचारपूस केली जात आहे. अशातच चावीावाल्याचा जबाब समोर आला आहे. १४ जूनला हा सुशांतच्या घरी पोहोचला तेव्हा काय झालं हे त्याने सांगितले.

माहीत नव्हतं स्टारचं घर आहे

रिपोर्टनुसार, या चावीवाल्याला  १४ जून रोजी जेव्हा दरवाज्याचा लॉक उघडण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा त्याला हे माहीत नव्हतं की, हे सुशांत सिंह राजपूतचं घर आहे. त्याने सांगितले की, सिद्धार्थ पिठानीने त्याला फोन केला होता. दरवाज्याचं लॉक उघडताच त्याला लगेच २ हजार रूपये दिले गेले आणि त्याला लगेच जाण्यासाठी सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता लॉकचा फोटो

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, चावी तयार करणाऱ्याने सांगितले की, मला १४ जूनला १.०५ वाजता सिद्धार्थ पिठानीचा फोन आला होता. मी त्याना व्हॉट्सअ‍ॅपवर लॉकचा फोटो पाठवण्यास सांगितले होते. मी सहाव्या मजल्यावर गेलो. मी माझ्या साहित्याने दरवाज्याचं लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. मग ते म्हणाले की, दरवाजा तोड. त्याला सांगण्यात आले होते की, जर आतून काही आवाज आला तर लगेच काम बंद कर.

हातोड्याने तोडलं कॉम्प्युटराइज्ड लॉक

चावीवाल्याने सांगितले की, लॉक कॉम्प्युटराइज्ड होतं. ते त्याला हातोड्याने तोडावं लागलं. लॉक तोडल्यावर त्याला २ हजार रूपये देऊन लगेच जाण्यास सांगण्यात आलं. त्याला रूममध्ये जाण्याच मनाई केली होती. त्याला तेथून दूर करण्यात आलं होतं.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या आत्महत्या केली होती. पण काही संशयास्पद गोष्टींमुळे या केसची चौकशीची मागणी परिवाराने लावून धरली होती. त्याचे फॅन्स आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही या केसबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर आता सीबीआय या केसचा तपास करत आहे.

हे पण वाचा :

सुशांतचा मृतदेह पाहून रिया चक्रवर्तीची उडाली होती घाबरगुंडी, या गोष्टीला घेवून मागितली होती माफी

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला घेतले जाऊ शकते ताब्यात, वकिलांचा दावा

कधी बेस्ट फ्रेन्ड होत्या सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती, सुशांतमुळे तुटली होती दोघींची मैत्री?

Web Title: Sushant Singh Rajput case : Keymaker talks about some important details from that night