राज कपूर यांचा आवाज असं संबोधलं जाणारे मुकेश आजही संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मुकेश यांनी राज कपूर यांच्यासाठी दोस्त दोस्त न रहा, जीना यहां मरन यहां, कहता है जोकर, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, आवारा हूं आणि मेरा जूता है जपानी यांसारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत. मुकेश यांचं नाव फक्त भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. 

मुकेश यांचा जन्म २२ जुलै, १९२३ साली झाला होता. त्यांचं पूर्ण नाव मुकेश चंद्र माथुर होते. त्यांचे वडील जोरावर चंद्र माथुर हे पेशानं इंजिनियर होते. मुकेश यांना भाऊ व बहिणी होती आणि ते सहावे होते. त्यांना बालपणापासूनच गाण्यांमध्ये रस होता. ते त्यांच्या क्लासमेट्सला गाणं ऐकावयाचे. मुकेश यांनी दहावी इयत्तेनंतर शिक्षण सोडलं आणि पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी करू लागले होते. 


मुकेश यांना सिनेमात काम करायचे होते. एकेदिवशी ते त्यांचे नातेवाईक मोतीलाल यांच्या बहिणीच्या लग्नाच गाणं गात होते. मोतीलाल यांना मुकेश यांचा आवाज आवडला. ते त्यांना मुंबईत घेऊन आले आणि गाण्याचे प्रशिक्षण दिलं, मुकेश यांनी १९४१मध्ये चित्रपट निर्दोषमध्ये अभिनय केलं. यासोबतच या चित्रपटातील गाणंदेखील त्यांनी स्वतः गायलं होतं. याशिवाय त्यांनी माशूका, आह, अनुराग व दुल्हन या सिनेमांमध्ये अभिनय केला. 


मुकेश यांनी त्यांच्या करियरमध्ये सर्वात पहिलं गाणं दिल ही बुझा हुआ हो तो हे गायलं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सुरूवातीचा काळ खूप कठीण होता. मात्र एक दिवस त्यांच्या आवाजाची जादू चालली. मुकेश यांचं गाणं ऐकून सहगलदेखील अचंबित झाले होते. पन्नासच्या दशकात मुकेश यांना शोमॅन राज कपूर यांचा आवाज असं संबोधू लागले.


मुकेश यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या करियरमध्ये जवळपास दोनशे सिनेमातील गाणी गायली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली, मात्र त्यांना इमोशनल गाण्यातून ओळख मिळाली. मुकेश यांनी 'अगर जिंदा हूं मैं इस तरह से', 'ये मेरा दीवानापन है', 'ओ जाने वाले हो सके तो लौट के आना', 'दोस्त दोस्त न रहा' या गाण्यांना स्वरसाज दिला. मुकेश हे फिल्मफेयरचा पुरस्कार मिळवणारे पहिले पुरूष गायक होते. मुकेश यांचे निधन २७ ऑगस्ट, १९७६ साली अमेरिकेत स्टेज शोदरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यावेळी ते 'एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल' हे गाणं गात होते.


Web Title: Singer Mukesh Birth Anniversary Know About His Unknown Facts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.