आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:07 AM2020-09-09T11:07:25+5:302020-09-09T11:09:12+5:30

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचे कॅम्पेन, सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंग म्हणते...

shweta singh kirti reacts on rhea chakrabortys statment that sushant insited her to take drug | आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले

आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले

googlenewsNext
ठळक मुद्देएनसीबीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीने 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतल्याचे कळतेय. 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला आणि या प्रकरणाने एकदम कलाटणी घेतली. यानंतर रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक झाली. एनसीबीच्या चौकशीत रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. मात्र ही कबुली देताना सुशांतने मला बळजबरी केल्याने कदाचित काहीवेळा मी ड्रग्ज घेतली असावी, असा दावा तिने केला. ड्रग्ज घेण्यासाठी सुशांतने बळजबरी केल्याच्या रियाच्या या दाव्यावर आता सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंग हिची प्रतिक्रिया आली आहे. रियाला अटक झाल्यानंतर अचानक बॉलिवूडकर तिला पाठींबा देत मैदानात उतरले आहेत, यावरही श्वेताने एक पोस्ट केली आहे.

मृत व्यक्ती बोलू शकत नाही...

मृत व्यक्ती बोलू शकत नाही, त्यामुळे मेलेल्यांवर आरोप टाकून मोकळे व्हा, लज्जास्पद...! अशी एक पोस्ट श्वेताने केली. 

यानंतर आणखी एका ट्विटमध्ये श्वेताने लिहिले, ‘ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर इतके लोक पाठींबा का देत आहेत, हे थोडे डोके लावल्यानंतर लगेच लक्षात येते. चिंता करू नका, आम्ही इतके मूर्ख नाही. फक्त संपूर्ण सत्य बाहेर येण्याची प्रतीक्षा आहे. मग बघू किती पाठींबा मिळतो.’


चिंता करू नका, संयम ठेवा
रिया चक्रवर्तीला अटक होताच सुशांतची बहीण किर्तीने लगेच प्रतिक्रिया दिली होती. चिंता करू नका, संयम ठेवा़ संपूर्ण सत्य बाहेर येईल, असे तिने म्हटले होते. एनसीबी, सीबीआय आणि ईडी सर्वोत्तम काम करत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर आपल्यासोबत आहे, असेही एका पोस्टमध्ये तिने लिहिले होते.

रियाने घेतले 25 सेलिब्रिटींची नावे
एनसीबीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीने 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतल्याचे कळतेय. बॉलिवूडच्या कोणकोणत्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जाते, याची यादीही रियाने एनसीबीला दिली आहे. त्यामुळे आता एनसीबी सुशांतचे सहकलाकार आणि काही इतर कलाकारांचीदेखील चौकशी करणार आहे.

विचित्र योगायोग! रियाच्या अटकेनंतर व्हायरल होतेय तिचे 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट

 रियाची ड्रग्ज गँग होती अ‍ॅक्टिव्ह   
तपासानुसार, 2017, 2018,2019 मध्ये रियाची ड्रग्स गँग फार अ‍ॅक्टिव होती. तपास यंत्रणेला रियाच्या घरातून ताब्यात घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमधून या लोकांचे फोटो, व्हिडीओ आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटीग, एसएमएस आढळले आहेत. यात बॉलिवूडचे अनेक मोठे चेहरेही दिसून आलेत. आता बॉलिवूडमधील हे मोठे चेहरे एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

Web Title: shweta singh kirti reacts on rhea chakrabortys statment that sushant insited her to take drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.