रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 10:26 AM2020-09-09T10:26:50+5:302020-09-09T10:30:03+5:30

एनसीबीने रियाला ड्रग सिंडिकेटची एक अ‍ॅक्टिव सदस्य असल्याचं सांगितलं. अशात रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात बॉलिवूडमधील काही मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री रियाच्या समर्थनात पुढे आले आहेत. 

Many bollywood celebrities came in support of Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये मुख्य आरोपी मानली गेलेल्या रिया चक्रवर्तीला मंगळवारी एनसीबीने अटक केली. रियाला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. एनसीबीने रियाला ड्रग सिंडिकेटची एक अ‍ॅक्टिव सदस्य असल्याचं सांगितलं. अशात रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात बॉलिवूडमधील काही मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री रियाच्या समर्थनात पुढे आले आहेत. 

मंगळवारी रिया चक्रवर्तीला अटकेनंतर चांगलीच चर्चा रंगली. तसेच तिने घातलेल्या टी-शर्टवरील टेक्स्टही चांगलीच चर्चेत राहिलं. त्यावर लिहिलं होतं की, 'गुलाब लाल असात, वॉयलेट्स निळे असतात, आपण सगळे मिळून पितृसत्तेचा हा किल्ला उद्धवस्त करू'.  आता रियाच्या टी-शर्टवरील हा मेसेज तिच्या समर्थनाचं माध्यम ठरला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीने हा संदेश शेअर करून रियाला सपोर्ट केलाय आणि तिच्या अटकेला विरोध केलाय.

अनुराग कश्यप, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, अमृता अरोड़ा, दिया मिर्जा, शिबानी दांडेकर, अंगद बेदी, राधिका मदन, श्वेता बच्चन सारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या संदेशाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेलिब्रिटींनी #justiceforrhea आणि #SmashPatriarchy हे हॅशटॅग वापरले. जे आता ट्रेन्ड करत आहेत.

तेच दुसरीकडे सुशांतचे फॅन्सही सोशल मीडियावर त्याच्या सपोर्टमध्ये उभे दिसत आहेत. रियाला अटक झाल्यावर सर्वांनाच हे वाटत आहे की, सुशांतच्या गुन्हेगारांना आता शिक्षा मिळणारच. पण रियाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली आहे. तिच्यावर ड्रग्स खरेदी करण्याचा आरोप आहे.

हे पण वाचा :

सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न

'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

Sushant Singh Rajput Case: ड्रग विक्रेत्यांपासून बॉलिवूड पार्ट्यांपर्यंत; एनसीबीसमोर रियाचा कबुली जबाब

Web Title: Many bollywood celebrities came in support of Rhea Chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.