सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:08 PM2023-03-10T13:08:30+5:302023-03-10T13:10:01+5:30

सलमान आणि सतीश कौशिक यांच्यातही खास मैत्री होती.

salman khan seen teary eyed at the funeral of satish kaushik in mumbai | सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल

सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल

googlenewsNext

Satish Kaushik Death : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. काल संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी अनेक सेलिब्रिटी पोहोचले. अनुपम खेर, अभिषेक बच्चन, राज बब्बर, शहनाझ गिल, शिल्पा शेट्टी, सलमान खान यांसह अनेक कलाकार पोहोचले.

सतीश कौशिक यारो के यार होते. अनुपम खेर यांच्यासोबत तर त्याची जिगरी दोस्ती होती. हसतखेळत आयुष्य जगणाऱ्या सतीश कौशिक यांनी अचानक अशी एक्झिट घेतली जी चटका लावणारी होती. यावेळी अभिनेता सलमान खान (Salman Khan) भावूक झाला. सलमान गाडीतून पोहोचला तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलमान आणि सतीश कौशिक यांच्यातही खास मैत्री होती. सलमान खानचा २००३ मध्ये आलेला सुपरहिट सिनेमा 'तेरे नाम' सतीश कौशिक यांनीच दिग्दर्शित केला होता. सतीश कौशिक यांना कायमचा निरोप देताना सर्वांनाच गहिवरुन आलं.

सतीश कौशिक यांच्या परिवारात त्यांची पत्नी शशी कौशिक आणि ११ वर्षीय वंशिका यांचा समावेश आहे. सतीश कौशिक यांना आधी एक मुलगा होता मात्र २ वर्षांचा असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर ते कोलमडून गेले होते. त्या दु:खातून बाहेर यायला त्यांना बराच काळ लागला. यानंतर वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांना एक मुलगी झाली. त्यांच्या पत्नीने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला.

Web Title: salman khan seen teary eyed at the funeral of satish kaushik in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.