रिअल लाइफमध्ये रणवीर सिंहला काय हवंय, मुलगा की मुलगी? त्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:03 PM2022-04-19T15:03:59+5:302022-04-19T15:05:35+5:30

Ranveer Singh : रणवीर-दीपिकाच्या घरात पाळणा कधी हलणार? त्यांना बाळ कधी होणार? याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. अशात रणवीरने नुकताच खुलासा केला की त्याला मुलगा हवा आहे की मुलगी?

Ranveer Singh reveals he wants baby girl or baby boy | रिअल लाइफमध्ये रणवीर सिंहला काय हवंय, मुलगा की मुलगी? त्यानेच केला खुलासा

रिअल लाइफमध्ये रणवीर सिंहला काय हवंय, मुलगा की मुलगी? त्यानेच केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडमधील पॉवर कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचं लग्न होऊन आता बराच काळ झाला आहे. आता त्यांच्या घरात पाळणा कधी हलणार? त्यांना बाळ कधी होणार? याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. अशात रणवीरने नुकताच खुलासा केला की त्याला मुलगा हवा आहे की मुलगी? याचा खुलासा रणवीरने पहिल्यांदाच केला आहे.

रणवीर सिंहच्या जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ज्याप्रमाणे त्याने ट्रेलरमध्ये धुमाकूळ घातला आहे तसाच तो त्याच्या बिनधास्त अंदाजात ट्रेलरच्या इव्हेंट लॉंन्चमध्ये आला होता. या इव्हेंटमध्ये रणवीरने त्याच्या पर्सनल लाइफबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, त्याला रिअल लाइफमध्ये मुलगा हवा आहे की मुलगी.

एका पत्रकाराने रणवीरला प्रश्न विचारला की, रिअल लाइफमध्ये तुला मुलगा हवा की मुलगी? यावर बोलताना रणवीर म्हणाला की, 'हे तर देवाच्या हातात आहे. जे काही मिळेल ते आनंदाने ठेवेन. सिनेमातही एक डायलॉग आहे, जेव्हा देवाजवळ जाता तेव्हा प्रसादात शीरा मिळो वा लाडू तुम्ही तक्रार करत नाही'.

रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार'चा ट्रेलर चांगला आहे. ट्रेलरला चांगला रिस्पॉन्सही मिळत आहे. रणवीर या सिनेमात एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंह सिनेमात त्याच्या पत्नीच्या पोटात वाढत असलेल्या त्याच्या मुलीला आपल्या वडिलांपासून वाचवत फिरत आहे. कारण वडिलांना घरात कुलदीपक हवा आहे. त्यांना मुलगी नको आहे. आता तो हे कसं डील करतो हे सिनेमात बघायला मजा येईल. हा सिनेमा १३ मे रोजी रिलीज होणार आहे.
 

Web Title: Ranveer Singh reveals he wants baby girl or baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.