Ranveer Singh : साऊथ विरूद्ध बॉलिवूड वादावर रणवीरचं सुंदर उत्तर, वाचून तुम्हीही म्हणाल, भाऊ जोरदार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:30 PM2022-05-11T15:30:26+5:302022-05-11T15:33:13+5:30

Bollywood Vs South Cinema : साऊथ विरूद्ध बॉलिवूड अशा वाद सध्या रंगला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याचीही प्रतिक्रिया आली आहे.

ranveer singh on hindi language debate south films success Bollywood Vs South Cinema | Ranveer Singh : साऊथ विरूद्ध बॉलिवूड वादावर रणवीरचं सुंदर उत्तर, वाचून तुम्हीही म्हणाल, भाऊ जोरदार! 

Ranveer Singh : साऊथ विरूद्ध बॉलिवूड वादावर रणवीरचं सुंदर उत्तर, वाचून तुम्हीही म्हणाल, भाऊ जोरदार! 

googlenewsNext

Bollywood vs South Cinema : साऊथ विरूद्ध बॉलिवूड अशा वाद सध्या रंगला आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगण व साऊथ स्टार किच्चा सुदीप यांचं ट्विटर वॉर हा नुकताच गाजलेला एक अंक़ आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याचीही प्रतिक्रिया आली आहे. रणवीरनं या वादात उडी घेतली खरी. पण आगीत तेल ओतण्याऐवजी त्यानं या आगीवर पाणी ओतून ती विझवण्याचा प्रयत्न केला. होय, त्याने या मुद्यावर अतिशय संतुलित व सुंदर उत्तर दिलं.
साऊथ विरूद्ध बॉलिवूडवर सध्या चर्चा आहे. हिंदी भाषेचा मुद्दाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर रणवीरला प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचं उत्तर ऐकून सगळेच प्रभावित झालेत.

‘बॉलिवूड लाईफ’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘बघा, मी एक कलाकार आहे. मला चित्रपटाचा बिझनेसबद्दल फार काही ठाऊक नाही. कारण मी ना ट्रेंड पर्सन आहे,ना प्रोड्यूसर आहे. मी फक्त पैशाच्या मोबदल्यात काम करणारा एक साधा प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. कॅमेºयासमोर अभिनयाचे मला पैसे मिळतात. त्या नात्यानं ते चित्रपट (साऊथचे) चांगले आहेत, एवढंच मी म्हणेल. मी तेलगू बोलत नाही. पण मी पुष्पा बघितला. आरआरआर बघितला. मी त्या भाषा बोलत नाही. पण ते चित्रपट बघून मी थक्क झालो. साऊथ इंडस्ट्री इतकं चांगलं काम करतेय, याचा मला अभिमान आहे. कारण मी त्या इंडस्ट्रीला कधी परकं मानलं नाही. ये तो सब अपना ही है यार...’

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा सिनेमा येत्या 13 मे रोजी रिलीज होतोय. हा एक सोशल कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटात रणवीरसोबत शालिनी पांडे, बोमन ईराणी आणि रत्ना पाठक शाह हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. शालिनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

Web Title: ranveer singh on hindi language debate south films success Bollywood Vs South Cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.