'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 10:02 IST2023-02-22T10:01:43+5:302023-02-22T10:02:54+5:30

'शमशेरा' सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला भन्नाट किस्सा

ranbir kapoor offered 30 thousand rupees rum to co actor saurabh shukla | 'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा

'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा

Saurabh Shukla : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) नुकताच 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा येऊन गेला. सिनेमातील त्याने साकारलेल्या 'शिवा' या भूमिकेचं कौतुक झालं. तर ब्रम्हास्त्रपूर्वी रणबीर 'शमशेरा' या सिनेमातही दिसला. मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर जोरदार आपटला. शमशेरामधील रणबीरचे सहकलाकार अभिनेते सोरभ शुक्ला यांनी नुकतेच रणबीरचे काही किस्से सांगितले आहेत. त्यातला एक किस्सा म्हणजे रणबीरने पाजलेली ३० हजाराची दारु. काय आहे तो नेमका किस्सा?

अभिनेते सौरभ शक्ला एका मुलाखतीत म्हणाले, 'शमशेराचं चित्रीकरण करत असताना मी रम प्यायलो ज्याची किंमत ३० हजार रुपये होती. ही रम रणबीर कपूरने मला दिली होती. तर रणबीरला ती अभिनेते नागार्जून यांनी ब्रम्हास्त्र सिनेमा वेळेस दिली होती. बाटली अर्धीच भरलेली होती. आम्ही ती उघडली तेव्हा त्यात एक क्वार्टर कमी होती. लेह मध्ये असताना रणबीरने मला विचारलं,'सर तुम्ही काय पिताय ?' मी सांगितलं,'ओल्ड मॉन्क'. तर त्यावर त्याने मला हे पाजलं. आम्ही मग खूप रम प्यायली. मग मी त्याला ओल्ड मॉन्क ऑफर केली. रणबीर कपूर सेटवर नेहमी हसत खेळत राहतो. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. मी त्याला चांगलं ओळखतो. '

ते पुढे म्हणाले, 'मला पार्टी करायला खूप आवडते. तेव्हा रणबीरसोबत ही दारु पार्टी करताना फार मजा आली. मला अजून बरेच काम करायचे आहे. माझं स्क्रीन टाईम वाढावं अशी मला आशा आहे. म्हणून सध्या मी खूप मेहनत घेतोय.'

अभिनेता सौरभ शुक्ला हे उत्तम कलाकार आहेत हे आपण अनेक सिनेमांमधून बघितलं आहे. त्यांनी कॉमेडी आणि डार्क रोल तितक्याच ताकदीने पेलल्या आहेत. रणबीर कपूरसोबत त्यांनी 'बर्फी' या सिनेमात याआधी काम केले आहे, 'रेड', 'पीके', 'जॉली एलएलबी', 'नायक' अशा अनेक सिनेमांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत.

Web Title: ranbir kapoor offered 30 thousand rupees rum to co actor saurabh shukla