इलियाना डिक्रुझचा मिस्ट्री मॅन आला समोर; अभिनेत्रीने दाखवली बॉयफ्रेंडची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:15 IST2023-07-17T12:11:10+5:302023-07-17T12:15:25+5:30

लग्नाआधीच गरोदर असलेल्या इलियाना डिक्रुझचा बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो व्हायरल

pregnant Ileana D'Cruz's shared her boyfriend misrty man photo goes viral | इलियाना डिक्रुझचा मिस्ट्री मॅन आला समोर; अभिनेत्रीने दाखवली बॉयफ्रेंडची पहिली झलक

इलियाना डिक्रुझचा मिस्ट्री मॅन आला समोर; अभिनेत्रीने दाखवली बॉयफ्रेंडची पहिली झलक

‘बर्फी’, ‘मैं तेरा हिरो’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ गरोदर आहे. इलियाना एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आई होणार असल्याची माहिती दिली होती. लग्न न करताच गरोदर राहिलेली इलियाना त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत होती. इलियानाच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता इलियानाचे या मिस्ट्री मॅनबरोबर फोटो समोर आले आहेत.

इलियाना डिक्रुझने ‘कॉफी विथ करण’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे इलियानाच्या गरोदरपणाबद्दल कळताच चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली होती. परंतु, इलियाना डिक्रुझ आता कतरिनाच्या भावाला नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे. इलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने ‘डेट नाईट’ असं कॅप्शन दिलं आहे. इलियाना व तिच्या बॉयफ्रेंडचे हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

परिणीती चोप्राची आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

इलियाना डिक्रुझने तिच्या इन्स्टाग्रामवरुन छोट्या बाळाच्या कपड्यांचा फोटो शेअर करत गरोदर असल्याची गुडन्यूज दिली होती. याबरोबरच तिने ‘मम्मा’ असं लिहिलेल्या चेनचा फोटोही शेअर केला होता. त्यानंतर इलियानाने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटोही शेअर केला होता.

Web Title: pregnant Ileana D'Cruz's shared her boyfriend misrty man photo goes viral