हॉलिवूड सिंगर, गायक व प्रियंका चोप्रा हिचा नवरा निक जोनस आज त्याचा २७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. निक जोनासप्रियंका चोप्रा डिसेंबर, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. प्रियंका चोप्रा हल्ली चित्रपटांपेक्षा तिचा नवरा निक जोनासमुळे जास्त चर्चेत असते. निक आणि प्रियांका यांच्या वयात तब्बल ११ वर्षांचे अंतर आहे. निक २६ वर्षांचा तर प्रियांका ३७ वर्षांची आहे. निकला वयाच्या १३ व्या वर्षी डायबिटीज झाला होता.

व्होग मॅगझिनच्या नुसार, निकने सर्वात आधी क्वांटिकोमध्ये प्रियंका चोप्राला पाहिलं होतं. त्यानंतर त्याने त्याचा सहकलाकार ग्राहम रोजर्सला मॅसेज पाठवला. निकने लिहिलं होतं की, प्रियंका खूप सुंदर आहे. त्यानंतर त्याने २०१७ साली प्रियंकाला सोशल मीडियावर मॅसेज लिहिलं की, आपले कॉमन फ्रेंड्स बोलत आहेत की आपण भेटलं पाहिजे.


प्रियंकाने सांगितलं की, पहिल्या डेटवर लॉस अँजेलिसला गेले होते आणि तिथे निकने तिला सांगितलं होतं की, मला तु जशी आहेस तशी आवडते. मला तुझा दृष्टीकोन खूप आवडतो. तिसऱ्या डेटवेळी निकने प्रियंकाला ग्रीसमध्ये गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं होतं. प्रियंकाने ४५ सेकंद शांत राहिल्यानंतर होकार दिला होता.


टाईम्स नाऊनं दिलेल्या रिपोर्टनुसार, निक जोनासला वयाच्या १३ व्या डायबिटीज झाला होता. याबाबत त्यानेच सोशल मीडियावर खुलासा केला होता. निक जोनसने त्याचे दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करून लिहिलं की, १३ वर्षांपूर्वी मला डायबिटीज असल्याचं समजलं होतं. माझा हा फोटो डायबिटीज होण्यापूर्वीचा आहे.
या पोस्टच्या पुढे त्याने लिहिलं की, माझ्या डाएटवर मी खूप कंट्रोल केला. त्यासोबत माझ्या तब्येतीवर खूप लक्ष दिलं.

मी दररोज एक्सरसाईज करतो आणि रक्त तपासणी करतो. आता या आजारावर मी कंट्रोल केला आहे.


Web Title: Nick Jonas had a serious illness at the age of 13
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.