भारतीय जुन्या गीतांना ‘देशी’च राहू द्या : कविता कृष्णमूर्ती यांचा ‘रिमिक्स’कारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:55 PM2020-01-08T20:55:03+5:302020-01-08T20:59:36+5:30

संगीतामध्ये खूप वाद्य हावी न करता केवळ गाण्यावर लक्ष्य केंद्रित करायला हवे...

Let Indian old songs remain 'native': Kavita Krishnamurhyi advises remixers | भारतीय जुन्या गीतांना ‘देशी’च राहू द्या : कविता कृष्णमूर्ती यांचा ‘रिमिक्स’कारांना सल्ला

भारतीय जुन्या गीतांना ‘देशी’च राहू द्या : कविता कृष्णमूर्ती यांचा ‘रिमिक्स’कारांना सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देसंगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि बदलते प्रवाह याविषयी संवाद‘फ्युजन’ वाजवायचे असेल तर तुमचे पाश्चिमात्य आणि भारतीय संगीतावर प्रभुत्व असणे गरजेचे रियाज हवाच म्हणून संगीत हे आयुष्यभर शिकण्याची गोष्ट

पुणे : आज संगीत क्षेत्रात  ‘रिमिक्स’ गाण्यांचे प्रमाण वाढले आहे. मी ‘रिमिक्स’ ची फारशी चाहती नाही. मात्र जुनी गीते इतकी चांगली आहेत. म्हणूनच ती पुन्हा नव्या स्वरूपात आणली जात आहेत. पण ‘रिमिक्स’ हे अजून चांगल्या ढंगामध्ये व्हायला हवे. संगीतामध्ये खूप वाद्य हावी न करता केवळ गाण्यावर लक्ष्य केंद्रित करायला हवे. पाश्चात्य  ‘रँप’ टाकले नाहीतर तर ऐकणं अधिक सुसहय  होईल. भारतीय गीतांना ’देशी’च राहू देत, असा सल्ला  प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी ‘रिमिक्स’करांना दिला. 
विश्वकर्मा विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वतीने आयोजित ‘लक्ष्मीनारायण ग्लोबल म्युझिक फेस्टिवल’च्या निमित्ताने गायिका कविता कृष्णमूर्ती  आणि व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि बदलते प्रवाह याविषयी संवाद साधला. कृष्णमूर्ती यांनी संगीताचा जुना सुवर्णकाळ आणि आताच्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकला. तर डॉ. सुब्रमण्यम यांनी भारतीय संगीताला आलेले ग्लोबल स्वरुप याविषयी विचार मांडले.
’रिमिक्स’ होत आहे. कारण आपल्या जुन्या गीतांना तोड नाही. आजही ही गाणी नव्या ढंगात आणावी वाटते याचे सर्व श्रेय आपल्या श्रेष्ठ संगीतकारांना असल्याचे कविता कृष्णमूर्ती यांनी सांगितले. 
जुन्या संगीताचा काळही कृष्णमूर्ती यांनी उलगडला. त्या म्हणाल्या, पूर्वीचे संगीत वैभवशाली होते. मी गायन क्षेत्रात आले. तेव्हा रोमँटिक गाणे आणि शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यांचा अंतर्भाव होता. ’आयटम सॉंग’ खूप कमी असायची. आजचा विचार केला तर  संगीतात तांत्रिकदृष्ट्या खूप बदल झालेले आहेत.1942 अ लव्ह स्टोरी’ मध्ये ऑर्केस्ट्राचा वापर व्हायचा. गायकांकडून काही चूक झाली तर सुधारण्याची संधी नव्हती. पूर्ण गाणे पुन्हा करावे लागत असे.  ‘हवाहवाई’ हे गाणे मी एका टेकमध्ये गायले. मात्र अशी कितीतरी गाणी होती जी मला सात ते आठ वेळा गावी लागली आहेत. 1990 नंतर डबिंगचा काळ आला. एक मुखडा आणि एक अंतरा. एकेक लाईन कमी गायला लागायची. 2000 नंतर असा काळ आला की एकेक लाईन गायक गाऊ लागले आहेत. मी असही ऐकलय की फ्रेज टू फ्रेज पण गात आहेत. संगीतात तांत्रिकदृष्ट्या जे बदल झाले त्याची मी साक्षीदार ठरले. तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टी बदलल्या आहेत. 
’फ्युजन’ विषयी विचारले असता त्या पुढे म्हणाले, ’फ्युजन’ चे पायोनिअर  माझे पती डॉ. एल सुब्रमण्यम आहेत असे म्हणावे लागेल. 1970 च्या दशकात त्यांनी  ‘फ्युजन’ सुरू केले. त्याकाळात श्री.श्री रवीशंकर यांच्याव्यक्तिरिक्त फारसे कुणी कलाकार  ‘फ्युजन’’ करीत नव्हते. मला जेव्हा  ‘फ्युजन’ गायला बोलावले तेव्हा  ‘फ्युजन’ नक्की काय? हे मला फारसे माहिती नव्हते. ते जे वाजवतात तेव्हा गायनात  ‘हार्र्मनिक’ बदल होतात.  ‘फ्युजन’चे सादरीकरण करताना ते हार्मनीनुसार यंत्रणेमध्ये बदल करून वाजविले जाते. ‘फ्युजन’ वाजवायचे असेल तर तुमचे पाश्चिमात्य आणि भारतीय संगीतावर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. दोन्ही संगीताच्या शैलींचे ज्ञान पाहिजे. एका शैलीवर  ‘फ्युजन’ चालविणे शक्य नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
........
आजकाल ‘तंत्रज्ञान’ आणि ‘सोशल मीडिया’ संगीतावर हावी झाल्यासारखं वाटत आहे. एका तरुणाने गाणे केल्यानंतर ते शूट करून सोशल मीडियावर टाकणे या मध्ये त्याचा खूपवेळ जात आहे. पूर्वी हे काम म्युझिक कंपन्या करायच्या. संगीतकाराकडे साधनेसाठी खूप वेळ होता. आता मात्र, तीन तास गाणे गाण्यात आणि नंतर पुढचे तीन तास त्यावर काम करण्यात जात आहेत. शेवटी चांगले ‘संगीत’ हे चांगले ‘संगीतच’ राहणार आहे. चांगले संगीत ऐकल्यावर मेंदूच्या चेतनांमधून कानाला ऐकायला चांगले वाटेल. जो कलाकार ‘बनावटी’ आहे. तोही लगेच कळेल.- कविता कृष्णमूर्ती, प्रसिद्ध गायिका. 
...................
ापुण्यातील रसिक हे खरे संगीत प्रेमी आहेत. त्यांना कलेशी प्रेम आहे. त्यामुळे त्यांची दाद आम्हा कलाकारांसाठी महत्त्वाची असते. आमच्या सांगितीक कार्यक्रमात आज ग्लोबल कलाकार सहभागी होत आहेत. हा बदल खूप चांगला आहे. आपले संगीत जागतिक स्तरावर नावाजले जाते. विद्यापीठातून संगीत शिकताना आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान मिळते; पण संगीत हे रियाजातून आणि दिर्घकाळ शिकण्याची प्रक्रिया आहे. संगीत जे मनात आहे ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे. कोणतीही कला ही शिकल्यानंतरच गवसते. त्यासाठी रियाज हवाच म्हणून संगीत हे आयुष्यभर शिकण्याची गोष्ट आहे. संगीताला मर्यादा नसतात. त्याला सीमा नाहीत. ती जागतिक भाषा आहे. संगीतात खूप ताकद आहे. आपण भावनिक असो वा कोणत्याही प्रकारे त्याच्याशी जोडले जातो. संगीतातील कलाकरांना राजकीय मर्यादा नसतात. कारण संगीत हे जागतिक स्तरावर कलाकारांना एकमेकाशी जोडते.- डॉ. एल सुब्रमण्यम, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिनवादक 

Web Title: Let Indian old songs remain 'native': Kavita Krishnamurhyi advises remixers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.