Kriti Sanon and Sushant Singh Rajput were dating told Lizaa Malik | सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा

सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा

सुशांत सिंह राजपूत याच्या काही नव्याने सापडलेल्या नोट्समधून क्रिती सेननचं नाव समोर आलं आणि ती पुन्हा एकदा चर्चेत आली. आता अभिनेत्री लीसा मलिकने दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन भलेही मान्य करत नसतील, पण दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघे सोबत आनंदी होते. लीजाचं सुशांतसोबत प्रोफेशनल रिलेशन होतं. ती म्हणाली की, दोघे एका बर्थडे पार्टीत फार आनंदी होते.

लीसाने न्यूज एजन्सी IANS ला सांगितले की, मी सुशांतला साधारण अडीच वर्षांआधी भेटले होते. तेव्हा तो क्रितीसोबत होता. क्रितीची बर्थडे पार्टी होती.  बांद्रा क्लबमध्ये सेलिब्रेशन होतं. तो नेहमीच एक चार्मिंग व्यक्ती होता जो पार्ट्यांमध्ये जाऊन लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आणत होता. आमचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स होते जसा महेश शेट्टी.

लीसाने सांगितले की, तो फार मस्त आणि प्रेमळ होता. त्याचा सेंस ऑफ ह्यूमर चांगला होता आणि नेहमी जोक्स ऐकवून एक वेगळंच वातावरण तयार करायचा. जेव्हा लीसाला विचारलं गेलं की, सुशांत आणि क्रिती तिला कपलसारखे का वाटत होते? तर यावर ती म्हणाली की, जेव्हा पब्लिक गॅदरिंग किंवा एखादी बर्थडे पार्टी असेल तर होस्ट नेहमी बिझी असतात. त्यामुळे क्रिती पार्टीमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होती. मी पाहिले की, सुशांत फारच आनंदी आहे. डान्स करत आहे. ड्रिंक घेत आहे आणि सर्वांशी बोलत आहे. तो फार आनंदी होता आणि एक चांगला होस्ट बनण्याचा प्रयत्न करत होता.  भलेही तुम्ही जगाला ओरडून सांगू नका, पण स्पार्क समजून येतो.

आम्हाला सर्वांना माहीत होतं दोघे सोबत आहेत

लीसा म्हणाली की, जर कुणी खऱ्या होस्टसोबत होस्टप्रमाणे वागत असेल तर काहीतरी नक्की असतं. आम्हा सर्वाना हे माहीत होतं, ते किती नाकारत असतील तरी. क्रिती आणि सुशांतने कधीही त्यांच्या रिलेशनशिपची बातमी कन्फर्म केली नाही. दोघांनी २१७ मध्ये राब्ता सिनेमात एकत्र काम केलं होतं.

दरम्यान, नुकत्याच फार्म हाऊसवर सापडलेल्या सुशांतच्या हस्तलिखित काही नोट्समध्ये अभिनेत्री क्रिती सेननचं नाव समोर आलं. क्रितीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असा त्यात त्याने उल्लेख केला होता. यावरूनही दोघे रिलेशनशिपमध्ये होते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :

क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही...

'छिछोरे'च्या सक्सेस पार्टीला आली होती श्रद्धा कपूर, मोठ्या प्रमाणात झाला होता ड्रग्सचा वापर

यामुळे रियावर नाराज झाला होता सुशांत; फार्म हाऊस मॅनेजरचा दावा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kriti Sanon and Sushant Singh Rajput were dating told Lizaa Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.