Shraddha kappor name in sushant singh rajput drugs case rhea chakraborty revealed to ncb | 'छिछोरे'च्या सक्सेस पार्टीला आली होती श्रद्धा कपूर, मोठ्या प्रमाणात झाला होता ड्रग्सचा वापर

'छिछोरे'च्या सक्सेस पार्टीला आली होती श्रद्धा कपूर, मोठ्या प्रमाणात झाला होता ड्रग्सचा वापर

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ड्रग्स अँगलची चौकशी सध्या एनसीबी करते आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीसह जवळपास एक डझन लोकांना एनसीबीने अटक केली आहे. रियाने ड्रग्सशी संबंधीत 25 बॉलिवूड सेलेब्सची नाव एनसीबीला सांगितली आहेत. ज्यात सारा अली खानस रकुल प्रीत सिंग आणि सिमोन खंभाटा यांची नाव समोर आली आहेत. 

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, छिछोरे सिनेमाची सुशांत सिंग राजपूतच्या फार्महाऊसवर झालेल्या सक्सेस पार्टीत ही अभिनेत्री आली होती. या पार्टीत मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा वापर झाला होता. यापार्टीत श्रद्धा कपूर आणि छिछोरे सिनेमाची स्टारकास्ट सामील होती.  त्याचबरोबर या पार्टीत सामील झालेली आणखी एक अभिनेत्री अजूनही एक रहस्यच बनून राहिली आहे. 


फार्महाऊसवर श्रद्धा कपूर आली होती
सुशांतचे फार्महाऊस सभांळणाऱ्या रियाजने सांगितले की, सुशांत या फार्महाऊसवर महिन्यातून 3 ते 4 वेळा यायचा. छिछोरे सिनेमाचे शूटिंग ज्यावेळी पुण्याजवळ सुरु होते तेव्हा एकदा श्रद्धा कपूर आली होती. त्याने हेदेखील सांगितले की, सारा अली खानने नोव्हेंबर 2018पासून फार्महाऊसवर येणं सुरु केले होते. 


फार्महाऊसवर व्हायची पार्टी 
सुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी करायचा. त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत, असा कबुलीजबाब रियाने एनसीबीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

एनसीबीचा छापा
अलीकडे एनसीबीने सुशांतच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता़ यावेळी त्यांना औषधे, एशट्रे आणि हुक्का यासारख्या वस्तू आढळल्या. या वस्तूंचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी केला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत येथे रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि इतरांसह पार्टी करत असे. सुशांतने हे फार्महाऊस भाड्याने घेतले होते आणि त्यासाठी दरमहा अडीच ते तीन लाख रुपये तो द्यायचा.

सुशांतसाठी परदेशातून मागवले जात होते ड्रग्स, या पत्यावर व्हायची डिलिव्हरी

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha kappor name in sushant singh rajput drugs case rhea chakraborty revealed to ncb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.