सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर आता एनसीबीने कारवाई करत रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. या प्रकरणी एनसीबीच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की सुशांत आणि रिया हाय क्वॉलिटीचे ड्रग्स आवडत होते जे भारतात इंपोर्ट केले जात आहेत. या ड्रग्सची ऑर्डर रिया चक्रवर्ती देत होती पण ड्रग्सची डिलेव्हरी सुशांतच्या घरच्या पत्यावर होत होती. 

रिया आणि सुशांतला हाय क्वॉलिटी बड्सचे सेवन करायला आवडत होते. त्यांच्यासाठी हे ड्रग्स नेदरलँडमधील एम्स्टर्डम शहर, कॅनडा आणि युकेमधून येत होते. एनसीबीनुसार, या तीन देशांमध्ये जगातील सर्वात महागडे आणि उच्च दर्जाचे बड्स मिळतात. ड्रग्स माफिया मागणीनुसार हे हाय क्वॉलिटी बड्सची तस्करी करून भारतात आणले जातात आणि पेडलर्सच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केले जातात.

फॉरेन लिंकचाही केला जाणार तपास
खास संधीवर बड्स सप्लाय करण्याचे निर्देश रिया देत होती. तस्करी करून भारतात आणलेले हाय क्वॉलिटी बड्सची डिलिव्हरी सुशांतच्या घरी व्हायची. याशिवाय सुशांतच्या घरी हिमाचल प्रदेशवरून येणारा चरस मागवला जात होता. आता एनसीबी सुशांतकडे सप्लाय होणाऱ्या बड्सच्या फॉरेन लिंकचाही तपास करत आहे.

रकुल प्रीतने हायकोर्टात दाखल केली याचिका
ड्रग्स प्रकरणात अटक केलेल्या रिया चक्रवर्तीने २५ बॉलिवूड सेलिब्रेटींच्या नावाचा खुलासा केला होता. यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि रणवीर सिंगची फॅशन डिझायनर सिमोन खंबाटाच्या नावाचाही समावेश आहे. या प्रकरणी नाव समोर आल्यावर रकुल प्रीत सिंगने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तिने तिला अडकवण्यात येत असल्याचे सांगितले आहे आणि तिच्या प्रतिमेला नुकसान पोहचवले जात असल्याचे म्हटले आहे.

फार्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी? 
ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर एनसीबी सुशांतच्या पवना डॅमजवळ असलेल्या फार्महाऊसची तपासणी करायला गेली होती. रिपोर्टनुसार इथल्या एका बोट चालवणाऱ्या व्यक्तीने एनसीबीच्या टीमला सांगितले की, रिया आणि साराला त्याने अनेक वेळा सुशांत सोबत बघितले आहे. त्याच बरोबर सुशांतसोबत श्रद्धा कपूरला सुद्धा याठिकाणी बघितल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. सुशांतच्या या फॉर्महाऊसवर ड्रग्स पार्टीचे आयोजन केले जायचं का?, या दृष्टिने तपास केला जातोय.
 

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा

NCBच्या चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा, इतक्या वेळा सुशांत सिंग राजपूतला केले होते ड्रग्स सप्लाय

सुशांत प्रकरणात पुढच्या आठवड्यात एम्सची टीम देणार CBI कडे 'तो' महत्त्वाचा रिपोर्ट

सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Drugs were being ordered from abroad for Sushant, delivery to this address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.