Ncb interrogation this accused made a big disclosure told how many times sushant singh rajput was supplied drugs | NCBच्या चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा, इतक्या वेळा सुशांत सिंग राजपूतला केले होते ड्रग्स सप्लाय

NCBच्या चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा, इतक्या वेळा सुशांत सिंग राजपूतला केले होते ड्रग्स सप्लाय

सुशांत सिंग प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वी करमजीत सिंग आनंद उर्फ ​​K J ला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार करमजीत सुशांतला ड्रग्स सप्लाय करत होता. करमजीतकडून मोठ्या प्रमाणात एनसीबीने गांजा आणि चरस जप्त केले आहेत. करमजीतने एनसीबीच्या चौकशीत अनेक मोठे आणि महत्त्वाचे खुलासे केले आहे. 


एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, केजे ने चौकशीत ऐकूण 150 नावांचा खुलासा केला आहे. या 150 लोकांच्या लिस्टमध्ये केजेचे हाय प्रोफाइल क्लाइंट्स आणि मोठ्या ड्रग पेडलर्सची नावे आहेत. या लिस्टमध्ये बॉलिवूडची बऱ्याच मोठ्या नावांचा सामावेश आहे. बॉलिवूडमधील अनेकजण केजेचे क्लाइंट्स  होते.

केजेने चौकशीत केले अनेक खुलासे
एनसीबीच्या चौकशीत केजेने कुबूल केले आहे की त्याने  वेळा स्वत: सुशांत सिंग राजपूतला ड्रग्स सप्लाय केले होते. करमजीत सिंग मुंबई आणि गोव्यातील अनेक सक्रिय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता. एनसीबी आता 150 लोकांची चौकशी करत आहे ज्यांची नावे केजेने चौकशीत दिली आहेत. गरज भासल्यास एनसीबी त्यांना चौकशीसाठी समन पाठवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार सूर्यदीपने केजेची ओळख रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीशी करुन दिली होती. यानंतर तो सुशांतला ड्रग्स सप्लाय करु लागला. 

कोण आहे केजे 
केजे तीन वर्षे आधी ड्रग्सच्या धंद्यात आला. घरात आर्थिक अडचणीमुळे तो तीन वर्षांपूर्वी काही पेडलर्सच्या संपर्कात आला आणि त्यानंतर अधिक पैसे मिळविण्याच्या इच्छेने तो ड्रग्सच्या व्यापारात आला. केजे आधी छोट्या-छोट्या डील करायचा. परंतु एका वर्षातच केजेने ड्रग्समध्ये आपला जम बसवला आणि ड्रग्स सप्लायर झाला. केजेची आई शिक्षिका असून त्याला एक लहान बहीण आहे आणि तो भाड्याच्या घरात रहातो. आईला केजेच्या ड्रग्स सप्लायर असल्याची काहीच कल्पना नव्हती. केजेला अटक केल्यानंतर घर मालकाने त्याच्या आईला घर खाली करण्याची नोटीस दिली आहे. केजे 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता

/

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ncb interrogation this accused made a big disclosure told how many times sushant singh rajput was supplied drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.