Kriti Sanon post on Sushant Singh Rajput says this on instagram | क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही...

क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही...

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. सुशांतसोबत सिनेमात दिसलेली अभिनेत्री क्रिती सेननने सुद्धा सुशांतच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत हे मोठं नुकसान असल्याचं म्हटलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे. पण रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावर आता कृतिने प्रतिक्रिया दिली आहे. क्रितीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय.

क्रितीने लिहिले की, 'ते आपल्यासाठी लढतात, त्यानंतर ते एकमेकांशी भांडतात, एक न थांबणारा उलटसुलट गोंधळ आणि आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाहीये. हे आता त्यांच्याबाबत झालं आहे. कदाचित नेहमीच हे असंच होतं...'. क्रितीची ही पोस्ट कुठेना कुठे याकडे इशारा करत आहे की, सुशांतच्या मृत्यूला दोषींना शोधण्याची कारवाई आता दुसरीकडेच गेली आहे. लोकांनी या मुद्द्यावर आवाज उठवला होता आणि आता हळूहळू ते त्यांच्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहेत.

दहा दिवसांआधीही क्रितीने एक अशीच पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने लिहिले होते की, ही काही सीक्रेट पोस्ट नाही...हे कुणाच्या सपोर्टमध्ये नाही किंवा विरोधातही नाही. कधी कधी गोष्टी सोप्या असतात. तिने लिहिले होते की, 'तुम्ही कधीही प्रत्येकाला खूश ठेवू शकत नाही. त्यामुळे प्रयत्नही करू नका. जोपर्यंत सत्य जाणता, जोपर्यंत तुमच्या मनाचा मेंदूसोबत ताळमेळ आहे, जोपर्यंत ज्या व्यक्तीप्रमाणे तसेच उठता, त्याच्यावर प्रेम करता....जेव्हा तुम्ही आरशा दिसणाऱ्या व्यक्तीला ओळखता, तुम्हाला कोणत्याही वादळात शांतता जाणवू शकते'.

दरम्यान, गुरूवारी सुशांत सिंह राजपूतच्या काही नोट्स समोर आल्या ज्यात क्रिती सेननचं नाव आहे. सुशांतने या नोट्समध्ये लिहिले की, कृति सेननसोबत जास्त वेळ घालवायचा आहे. क्रिती आणि सुशांतने 'राब्ता' सिनेमात एकत्र काम केलं होतं. दोघांच्या अफेअरची चर्चाही रंगली होती. पण दोघांनी कधीही त्यावर रिअ‍ॅक्शन दिली नाही.

हे पण वाचा :

सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये होते इतके कोटी रुपये, बँक डिटेल्समुळे झाला अनेक गोष्टींचा पर्दाफाश

सुशांत प्रकरणात नवीन खुलासा, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकचं सीक्रेट चॅट आलं समोर

यामुळे रियावर नाराज झाला होता सुशांत; फार्म हाऊस मॅनेजरचा दावा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kriti Sanon post on Sushant Singh Rajput says this on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.