sushant singh rajput farmhouse manager reveals shocking things about rhea chakraborty | यामुळे रियावर नाराज झाला होता सुशांत; फार्म हाऊस मॅनेजरचा दावा

यामुळे रियावर नाराज झाला होता सुशांत; फार्म हाऊस मॅनेजरचा दावा

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन महिने झाले आहेत, पण अभिनेत्याच्या आयुष्याशी असे अनेक रहस्य आहेत जे सर्वांना चक्रावून टाकणारे आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत  मृत्यू प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तिन्ही तपास यंत्रणा कसून तपास करत असताना रोज नवे खुलासे होत आहेत. आता सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर पवनने एका मुलाखतीत रियाबद्दल मोठा खुलासा केला आहे. रिपब्लिकन टीव्हीशी बोलताना पवनने हे खुलासे केलेत.
 

काय सांगितले पवनने?
रिया चक्रवर्ती आपल्या संपूर्ण खर्चासाठी सुशांतच्या पैशांचा वापर करत होती. सीए रजत मेवातीने मला सांगितले होते की, रिया पार्टी करायची आणि सुशांत झोपलेला असायचा. जेव्हा कधी मी शोविकला पाहिले तेव्हा तो नशेत असयाचा किंवा स्मोक करत असायचा. रिया सुशांतचा पैशांचा व्यवहार स्वत: सांभाळायची. रजतने मला सांगितलं होते की, सुशांतच्या बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत. सुशांतला रियाच्या करत असलेल्या या खचार्बाबत समजले तेव्हा तो खूप नाराज झाला होता, असे पवनने सांगितले.
श्रुती मोदीबद्दलही तो बोलला. ‘श्रुती मोदीने 2019 जुलैपासूनच येणे सुरू केले होते. रिया आल्यानंतर त्यांचा आयलँड ट्रिप वाढली होती.  शिवाय रिया फार्महाऊसवर नेहमी सुशांतसोबत यायची. गेल्या वर्षी 8 जुलैला रियाचा बर्थडे होता. वाढदिवसाच्या एक दिवस आधी मी रियाच्या कुटुंबाला पाहिले़ रियाचे आई-वडील आणि भाऊ शोविकला पाहिले़ शोविकसह एक तरुणीही होती’, असेही पवनने सांगितले.
अलीकडे सीबीआयने पवनची कसून चौकशी केली आहे. या चौकशीतही आपण हेच सर्वकाही सांगितल्याचे पवन या मुलाखतीत म्हणाला.
सीबीआयने आपली कित्येक तास चौकशी केली. सुशांत आणि रियाबाबत विचारलं. त्यावेळी आपण हे सर्वकाही सांगितल्याचं पवनने म्हटलं आहे.


 

फार्महाऊसवर व्हायची पार्टी
सुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी करायचा. त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत, असा कबुलीजबाब रियाने एनसीबीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

एनसीबीचा छापा
अलीकडे एनसीबीने सुशांतच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता़ यावेळी त्यांना औषधे, एशट्रे आणि हुक्का यासारख्या वस्तू आढळल्या. या वस्तूंचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी केला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत येथे रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि इतरांसह पार्टी करत असे.  सुशांतने हे फार्महाऊस भाड्याने घेतले होते आणि त्यासाठी दरमहा अडीच ते तीन लाख रुपये तो द्यायचा.

सापडल्या नोट्स
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन महिने झाले आहेत, पण अभिनेत्याच्या आयुष्याशी असे अनेक रहस्य आहेत जे सर्वांना चक्रावून टाकणारे आहे. आज तकच्या हाती सुशांतच्या वैयक्तिक नोट्स लागल्या आहेत. फार्महाऊसवर असताना सुशांतने नोट्स लिहून ठेवल्या होत्या. २७ एप्रिलच्या त्या नोट्स पाहता सुशांतला धुम्रपान सोडायचे होते, करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते, केदारनाथ सिनेमाची स्क्रिप्ट वाचायची होती, क्रिती सॅननसोबत वेळ घालवायचा होता, असे दिसते. या सगळ्या गोष्टी सुशांतने या नोट्समध्ये लिहून ठेवल्या होत्या. रिया सुशांतच्या आयुष्यात येण्याआधी तो सामान्य जीवन व्यतीत करत होता, असा खुलासाही या नोट्समधून झाला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नाव येताच रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव, दाखल केली याचिका

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput farmhouse manager reveals shocking things about rhea chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.