Karan Johar laughs on trolls comment on fabulous Lives of Bollywood wives | हेच राहिलं होतं! करण जोहरला यूजर म्हणाला सर्वात 'फेवरेट बायको', त्यानेही ट्रोलरचे मानले आभार!

हेच राहिलं होतं! करण जोहरला यूजर म्हणाला सर्वात 'फेवरेट बायको', त्यानेही ट्रोलरचे मानले आभार!

Fabulous Lives Of Bollywood Wives हा नेटफ्लिक्सवरील वेब शो काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. काही लोकांना स्टार वाइव्सच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेऊन मजा येत आहे तर काही लोकांना हा शो आवडत नाहीये. पण हा शो लोकांच्या चर्चेचा विषय ठरतोय. या शोमध्ये नीलम कोठारी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडेची पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफची झलक बघायला मिळते. तसेच यात पाहुणे कलाकार म्हणून अनेक मोठे चेहरेही दिसत आहेत.

नुकताच करण जोहरने या चारही स्टार वाइव्ससोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला अनेक लाइक्स मिळाले आणि अनेक कमेंट्सही आल्या. या फोटोवर एका ट्रोलरने फिल्ममेकर करण जोहरवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तर करणने त्याला तेवढंच मजेदार उत्तरही दिलं. (सलमानचा भाऊ सोहेलने पळून जाऊन सीमासोबत केलं होतं लग्न, आता दोघेही राहतात वेगळे?)

ट्रोलरने लिहिले की, मला वाटतं आपणा सर्वांनी हे समजून घ्यायला पाहिजे की, 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' मध्ये सर्वात फेवरेट वाइफ करण जोहर आहे. यावर करण जोहरने ट्विट रिट्विट करत लिहिले की, यावर मला फारच हसू येतंय. चांगला सेन्स ऑफ ह्यूमर असलेले ट्रोल खरंच रिफ्रेशिंग असतात. थॅक्स डॉक्टर. (गुलाबी थंडीत प्रेम फुलतंय! मलायकाने शेअर केला खास फोटो; अर्जुनच्या मिठीत सामावून, म्हणाली...)

करण जोहरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. यात त्याने सांगितले होते की, नीलम, भावना, सीमा आणि महीपसोबत जवळपास २० वर्षे जुनी मैत्री आहे. त्याने लिहिले होते की, आमच्या प्रेम करा किंवा ट्रोल करा, पण आम्हाला माहीत की, तुम्ही आम्हाला इग्नोर करू शकत नाही.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karan Johar laughs on trolls comment on fabulous Lives of Bollywood wives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.