Netlfix reality show fabulous lives of Bollywood Wives shows Seema and Sohail khan are living in separate houses | सलमानचा भाऊ सोहेलने पळून जाऊन सीमासोबत केलं होतं लग्न, आता दोघेही राहतात वेगळे?

सलमानचा भाऊ सोहेलने पळून जाऊन सीमासोबत केलं होतं लग्न, आता दोघेही राहतात वेगळे?

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली नवीन वेबसीरीज Fabulous Lives of Bollywood Wives सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या रिअ‍ॅलिटी सीरीजमध्ये बॉलिवूडच्या चार स्टार वाइव्सची कहाणी दाखवण्यात येत आहे. यात सोहेल खानची वाइफ सीमा खान, चंकी पांडेची वाइफ भावना, संजय कपूरची वाइफ महीप आणि समीर सोनीची वाइफ नीलमच्या जीवनाची कहाणी दाखवली जात आहे. 

या सीरीजमध्ये सीमा खानची कहाणी चर्चेत आहे. कारण तिला सोहेल खानपासून वेगळं राहताना दाखवण्यात आलं आहे. सीरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की, सीमा आणि सोहेल दोघेही वेगवेगळ्या घरात राहतात. 
सीमा म्हणते की, सोहेल घरी येत-जात असतो. त्यांचा मोठा मुलगा निर्माणही सोहेलसोबतच राहतो. सीमाच्या या गोष्टी ऐकून सोशल मीडिया यूजर्स प्रश्न उपस्थित करत आहेत की, काय सोहेल-सीमा सोबत राहत नाहीत? 

पळून जाऊन केलं होतं लग्न

सीमा ही दिल्लीची राहणारी आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली होती. यादरम्यान सीमा आणि सोहेलची पहिली भेट झाली. सोहेलनुसार तो पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडला होता. लवकच दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. दोघांना लग्न करायचं होतं. पण सीमाच्या घरचे लोक या लग्नासाठी अजिबात तयार नव्हते.

त्यामुळे सीमा आणि सोहेलने एक मोठा निर्णय घेतला. ज्या दिवशी सोहेलचा 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमा रिलीज झाला त्याच दिवशी दोघे घरातून पळून गेले होते आणि दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. नंतर दोघांच्या घरवाल्यांनी हे नातं स्वीकारलं. या कपलने नंतर निकाह सुद्धा केला होता. आता त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत.

फॅशन डिझायनर सीमा

लग्नानंतर सोहेलने सीमासोबत मिळून एंटरटेन्मेंट बिझनेस सुरू केला. बघता बघता सीमा टीव्ही आणि सिनेमातील लिडींग फॅशन डिझायनर झाली. 'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेचे कॉस्ट्यूम सीमाने डिझाइन केले होते. या मालिकेतून तिला ओळख मिळाली. सीमाचं वांद्रेमध्ये 'बांद्रा १९०' नावाचं बुटीक आहे. हे बुटीक ती सुझैन खान आणि महीप कपूरसोबत मिळून चालवते. तसेच सीमाचं मुंबईत ब्युटी स्पा आणि कलिस्ता नावाचे सलूनही आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Netlfix reality show fabulous lives of Bollywood Wives shows Seema and Sohail khan are living in separate houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.