Kangana Ranaut and Anurag Kashyap words war on twitter | अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात फारच चर्चेचा विषय ठरत आहे. बॉलिवूडमधील ९० टक्के लोक ड्रग्स घेत असल्याचं विधान केल्यावर अनेकांसोबत तिचे शाब्दीक खटके उडू लागले. आता बऱ्याच दिवसांनी कंगना आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यात 'युद्ध' पेटलंय. कंगनाच्या एका ट्विटला अनुरागने उत्तर दिलं आणि ट्विटर वॉर सुरू झालं.

कंगनाने ट्विट केलं होतं की, कंगना राणौतने नुकतेच ट्विट करत म्हटलंय की, मी क्षत्रिय आहे. डोके कापून घेऊ शकते पण झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज बुलंद ठेवेन. मान, सन्मान, स्वाभिमानासोबत जगले आहे आणि गर्वाने राष्ट्रवादी बनून जिंकत राहीन. तत्वांसोबत कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद.

कंगनाच्या या ट्विटवर अुनराग कश्यपने रिट्विट करत लिहिले की, 'बस तू एकच आहे बहीण - एकुलती एक मणिकर्णिका. तू ना चार-पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर. बघा किती आतपर्यंत जाऊन आले. त्यांना दाखवून दे की, जोपर्यंत तू आहे तोपर्यंत या देशांचं कुणी काही बिघडवू शकत नाही. तुझ्या घरापासून एक दिवसाचा प्रवास आहे LAC चा. जा वाघीण. जय हिंद'.

अनुरागच्या या ट्विटवर पलटवार करत कंगना म्हणाली की, 'ठिक आहे मी जाते बॉर्डरवर. तू पुढील ऑलम्पिकमध्ये जा. देशाला गोल्ड मेडल हवंय. हाहाहा हा काही बी ग्रेड सिनेमा नाही जिथे कलाकार काहीही बनतो. तू तर मेटाफॉर्सला लिटलरी घेऊ लागला. इतका मंदबुद्धी कधीपासून झाला, जेव्हा आपली मैत्री होती तेव्हा तर फार चतुर होतास'.

हे पण वाचा :

स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण...

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात

सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल....

उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut and Anurag Kashyap words war on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.