उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:45 PM2020-09-17T14:45:09+5:302020-09-17T14:46:15+5:30

कंगनाने बुधवारी रात्री टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरवर तिखट वार केला होता. ज्यानंतर उर्मिलाने अर्ध्या रात्री एक ट्विट केलं.

Urmila Matondkar hits back Kangna Ranaut via Shivaji Maharaj, Swara Bhasker lends support | उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेता उर्मिला मातोंडकरने कंगना रणौतवर तिच्या बॉलिवूड ड्रगस माफियाच्या वक्तव्यावरून टीका केलीये.  त्याला उत्तर म्हणून कंगनाने उर्मिलाला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असं संबोधलं. इतकेच नाही तर कंगनाने उर्मिलाच्या बॉलिवूड करिअरवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. आता कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी उर्मिलाच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत. दुसरीकडे उर्मिलाने कंगनाला नाव न घेता टोला लगावलाय.

कंगनाने बुधवारी रात्री टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरवर तिखट वार केला होता. ज्यानंतर उर्मिलाने अर्ध्या रात्री एक ट्विट केलं. उर्मिलाने रात्री १२.३१ वाजता एक ट्विट केलं. ज्यात तिने शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय. उर्मिलाने कंगनाचं नाव न घेता शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत लिहिले की, 'प्रतिशोध मनुष्‍य को जलाती रहती है, संयम ही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है।'

दुसरीकडे कंगनाने उर्मिलावर केलेल्या टिकेचा अभिनेत्री स्वरा भास्कर, फिल्ममेकर अनुभव सिन्हाने निषेध केलाय. स्वरा भास्कर ने उर्मिला मातोंडकरच्या काही सिनेमांची लिस्ट शेअर करत लिहिले की, 'उर्मिला जी 'मासूम', 'चमत्‍कार', 'रंगीला', 'दौड़', 'सत्‍या', 'भूत', 'कौन', 'जंगल', 'प्‍यार तूने क्‍या किया', 'तहजीब', 'पिंजर', 'एक हसीना थी...' मला तुमचे सर्वात चांगले परफॉर्मन्स आठवत आहेत. ज्यात तुम्ही जबरदस्त अभिनय आणि सुंदर डान्स केला. खूप सारं प्रेम.

तर अनुभव सिन्हाने ट्विट केलं की, उर्मिला मातोंडकर आतापर्यंतच्या सर्वात सुंदर, उत्तेजक आणि एक्सप्रेसिव अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याने उर्मिलाच्या 'सत्या' मधील कामाची प्रशंसा केलीय. 

काय म्हणाली होती कंगना?

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरवर पलटवार करत म्हणाली की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले.

उर्मिला मातोंडकरने साधला कंगनावर निशाणा

कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यानंतर तिला खूप विरोध झाला होता. याशिवाय कंगनाने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये असे कित्येक लोक आहेत जे ड्रग्सचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या विधानांवर उर्मिला मातोंडकरने कंगनाला चांगलेच सुनावले. उर्मिला म्हणाली की, संपूर्ण देश ड्रग्स समस्याने पीडित आहे. काय कंगनाला माहित नाही आहे की हिमाचल ड्रग्सचा गड आहे? तिला ही लढाई आपल्या गृह राज्यातून सुरू केली पाहिजे.

हे पण वाचा :

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात

सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल....

स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण...

Web Title: Urmila Matondkar hits back Kangna Ranaut via Shivaji Maharaj, Swara Bhasker lends support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.