Ek Aur Naren: Biopic on PM Narendra Modi to feature Gajendra Chauhan | एक और नरेन! आता गजेन्द्र चौहान बनणार ‘पीएम’  

एक और नरेन! आता गजेन्द्र चौहान बनणार ‘पीएम’  

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर याआधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा आला होता. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला आणखी एक सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होय, ‘एक और नरेन’ असे या सिनेमाचे नाव असून यात ‘महाभारत’ या मालिकेत युधिष्ठीरची भूमिका साकारणारे अभिनेता गजेंद्र चौहान मोदींची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत. 
गजेंद्र चौहान  यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी खूप दिवसांपासून या भूमिकेची तयारी करत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मिलन भौमिक हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा सिनेमा दोन भागात पे्रक्षकांना पाहायला मिळणार आहे.   एका भागात स्वामी विवेकानंद यांचे कार्य दाखवले जाणार तर दुस-या भागात मोदी कशाप्रकारे विवेकानंदांच्या विचारांचे अनुकरण करतात याबाबत सांगितले जाणार आहे.   मिलन भौमिक गेले वर्षभर मोदींच्या वैयक्तिक आयुष्यावर संशोधन करत होते. तूर्तास या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे आणि येत्या 12 मार्चपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.  येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर याआधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा आला होता. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यात अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ek Aur Naren: Biopic on PM Narendra Modi to feature Gajendra Chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.