Deepika Padukone will go to jail KRK claims on social media | दीपिका पादुकोण तुरूंगात जाणार! ड्रग्स प्रकरणी चौकशीआधीच केआरकेने केली भविष्यवाणी!

दीपिका पादुकोण तुरूंगात जाणार! ड्रग्स प्रकरणी चौकशीआधीच केआरकेने केली भविष्यवाणी!

सुशांत सिंह राजपूत केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर  आहेत. एनसीबीने ड्रग्स केसमध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर आणि सिमोन खंबाटा यांना चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. पुढील तीन दिवसात सर्वच अभिनेत्रींना एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल. यादरम्यान केआरकेने चौकशीआधीच भविष्यवाणी केली की, दीपिकाला तुरूंगात जावं लागणार आहे. ट्विट करून केआरकेने असा दावा केलाय.

दीपिका पादुकोणबाबत केआरकेने लिहिले की, 'एनसीबी लवकरच दीपिकाची चौकशी करणार आहे. यातून वाचण्यासाठी दीपिकाने ७ वकिलांची टीम तयार केली आहे. मला असं वाटतं की, दीपिकाने काहीही केलं तरी तिला तुरूंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. दीपिकाचं तुरूंगात जाणं निश्चित आहे'.

त्यानंतर केआरकेने करण जोहरवरही निशाणा साधलाय. दुसऱ्या एका ट्विटमध्ये केआरके ने लिहिले की, 'करण जोहरची मैत्रीण सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली की, फिल्ममेकर्सच्या पार्टीत ड्रग्सचा मोठा वापर होतो. मी तर नेहमीच हे सांगत होतो. वाईट वेळ आल्यावर मित्रही वैरी बनतात'.

केआरके इतक्यावरच थांबला नाही तर पुढील ट्विटमध्ये त्याने रणवीर सिंह आणि तापसी पन्नूसारख्या कलाकारांनाही सुनावले आहे. केआरकेने लिहिले की, 'तुम्हाला काय वाटतं एनसीबीच्या लिस्टमध्ये आणखी किती स्टार्स येणे शिल्लक आहेत. यात दीपिकाचं नाव आलं त्यामुळे रणवीर सिंहचं तर येणारच. अनुराग कश्यपंही नाव यात आहे. अशात त्याच्या मैत्रिणी रिचा चड्ढा आणि तापसी पन्नूही या लिस्टमध्ये सामिल होतील. या लिस्टमध्ये श्रद्धा कपूरच्या नावासोबत आदित्य रॉय कपूरचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. लवकरच मी तुम्हाला आणखी काही बॉलिवूड स्टार्सची नाव सांगणार आहे'.

दरम्यान, केआरकेचे हे ट्विट्स अशावेळी समोर आले आहेत जेव्हा एनसीबी बॉलिवूडच्या स्टार्सच्या नावांवरून पडदा उठवत आहेत. नुकताच एनसीबीने टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहरच्या घरी छापा मारला आहे. ड्रग पेडलर अनुज केसवानीच्या चौकशी दरम्यान सनम जोहर आणि अबिगेल पांडेची नावे समोर आली होती. या दोघांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं.

हे पण वाचा :

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने 'या' दोन व्यक्तींना ठरवले दोषी

नगमाचा प्रश्न - कंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं, NCB ने तिला समन्स का पाठवला नाही?

म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल 

रकुल प्रीत सिंह म्हणते समन्स मिळालाच नाही तर NCB म्हणाली ती कारण देत आहे!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone will go to jail KRK claims on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.