रकुल प्रीत सिंह म्हणते समन्स मिळालाच नाही तर NCB म्हणाली ती कारण देत आहे!

By अमित इंगोले | Published: September 24, 2020 11:17 AM2020-09-24T11:17:31+5:302020-09-24T11:24:46+5:30

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, रकुल कारण देत आहे. रकुलसोबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण रकुलने फोनला काहीही रिस्पॉन्स दिला नाही.

Rakul Preet Singh denies receiving summon for questioning NCB sources just an excuse | रकुल प्रीत सिंह म्हणते समन्स मिळालाच नाही तर NCB म्हणाली ती कारण देत आहे!

रकुल प्रीत सिंह म्हणते समन्स मिळालाच नाही तर NCB म्हणाली ती कारण देत आहे!

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचं नाव समोर आलं होतं. ज्यानंतर एनसीबीने रकुलला समन पाठवला होता. मात्र, रकुलने एनसीबीचा समन्स न मिळाल्याचे म्हटले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, रकुल कारण देत आहे. रकुलसोबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण रकुलने फोनला काहीही रिस्पॉन्स दिला नाही.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, रकुल प्रीत सिंहला समन्स देण्यात आला होता आणि तिला वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात फोनचाही समावेश आहे. पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. काहीही उत्तर मिळालं नाही. रकुल फोन उचलत नाहीये. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, रकुल सध्या हैदराबादमध्ये आहे.

एनसीबीकडून औपचारिक माहिती देण्यात आली आहे की, रकुल प्रीत सिंहला ड्रग्स केसमध्ये समन्स देण्यात आला होता. पण रकुल उपलब्ध नाही. तसेच कोणत्याही प्रकारचं उत्तर तिने एजन्सीला दिलेलं नाही.

रकुल प्रीत सिंहसोबतच सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्या घरी समन्स पाठवण्यात आला होता. या दोघींची चौकशी केली जाईल. रकुल प्रीत सिंह जर एनसीबीकडे चौकशीसाठी आली नाही तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

दरम्यान, ड्रग्स केसमध्ये रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोण ही मोठी नावे समोर आली आहेत. अर्थातच हा त्यांच्या फॅन्ससाठी मोठा धक्का आहे. दीपिकाची ड्रग चॅट समोर आली होती तर रकुलचं नाव चौकशीतून समोर आलं होतं. दीपिकाबाबत सांगायचं तर क्वान कंपनीची मॅनेजर करिश्मासोबत दीपिकाने केलेलं चॅट समोर आलं होतं. चॅटमध्ये दीपिकाने विचारले की, 'माल आहे का?'. आता दीपिकाला एनसीबीच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीचा समन्स मिळाल्यानंतर दीपिका पादुकोण टेन्शनमध्ये आली होती. दीपिकाने आपल्या परिवारासोबत आणि लीगल टीमसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला होता.  वकिलांचा सल्ला घेतला. मानले जात आहे की, दीपिका गोव्यातील शूटींग सोडून मुंबईला येण्यासाठी निघाली आहे. २५ तारखेला ती एनसीबीसमोर हजर होईल.

टॉप बॉलिवूड अभिनेत्रींना NCB कडून समन, कंगना म्हणाली - त्यांना पश्चाताप होत असेल....

श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड

ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती

 

Web Title: Rakul Preet Singh denies receiving summon for questioning NCB sources just an excuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.