नगमाचा प्रश्न - कंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं, NCB ने तिला समन्स का पाठवला नाही?

By अमित इंगोले | Published: September 24, 2020 11:56 AM2020-09-24T11:56:31+5:302020-09-24T11:56:41+5:30

अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेत्या नगमा यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, NCB ने आतापर्यंत कंगनाला समन्स का पाठवला नाही? कारण तिने तर मान्य केलंय की, ती ड्रग्स घेत होती.

Actress Nagma Raises question why NCB not summoned Kangana Ranaut who admitted drug addiction | नगमाचा प्रश्न - कंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं, NCB ने तिला समन्स का पाठवला नाही?

नगमाचा प्रश्न - कंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं, NCB ने तिला समन्स का पाठवला नाही?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत बेधडकपणे बोलत आहे. सध्या तिचा एका व्हिडीओही व्हायरल झालाय ज्यात ती म्हणाली होती की, ती ड्रग अ‍ॅडिक्ट होती. यावरून अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेत्या नगमा यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, NCB ने आतापर्यंत कंगनाला समन्स का पाठवला नाही? कारण तिने तर मान्य केलंय की, ती ड्रग्स घेत होती.

नगमा असंही म्हणाल्या की, NCB चौकशीदरम्यान अभिनेत्रींशी संबधित माहिती मीडियात शेअर करून टॉप बॉलिवूड अभिनेत्रींची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. नगमाने ट्विटमध्ये लिहिले की, एनसीबीने कंगनाला समन्स का पाठवला नाही. तिने तर स्वत: ड्रग्स घेण्याची बाब मान्य केलीय. ते व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर दुसऱ्या अभिनेत्रींना समन्स पाठवू शकतात? NCB ची ड्यूटी आहे का की, टॉप अभिनेत्रींशी संबंधित माहिती मीडियात लीक करावी?

एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स पाठवल्यावर नगमाने हे ट्विट केलं आहे.  सुशांत सिंह राजपूत केसमध्ये NCB ड्रग्स प्रकरणाचा तपास करत आहे. यात सुशांतचं कनेक्शन शोधलं जात आहे. तर सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे.

कंगनाने साधला निशाणा

दरम्यान,  बॉलिवूड अभिनेत्रींना समन पाठवल्यावर कंगनाने ट्विट करून लिहिले की, 'अखेर पहिल्यांदा बॉलिवूड माफिया मनवत आहे की, सुशांतला मारला गेला असू नये. पहिल्यांदा आपल्या क्रूरते, आपल्या मौनावर पश्चाताप होत असेल. पहिल्यांदा ते म्हणत असतील की, वेळ मागे घेऊन शकलो असतो तर'.

रिया चक्रवर्तीने घेतली २५ मोठी नावे

दरम्यान जेव्हा सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली तेव्हा तिने ड्रग्सची बाब मान्य केली होती. तिने यावेळी बॉलिवूडमधील २५ मोठ्या सेलिब्रिटींची नावे घेतली होती जे ड्रग्सचं सेवन करतात. त्यानंतर रियाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. नंतर जया साहासहीत ड्रग्स पेडलर्सच्या चौकशीतून समोर आले की, बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स ड्रग्सचं सेवन करतात. यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरसारख्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.

हे पण वाचा :

टॉप बॉलिवूड अभिनेत्रींना NCB कडून समन, कंगना म्हणाली - त्यांना पश्चाताप होत असेल....

श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड

ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती

Web Title: Actress Nagma Raises question why NCB not summoned Kangana Ranaut who admitted drug addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.