Deepika Padukone name comes out in Bollywood drug curtail read her drugs chats asks maal aahe ka | Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

ठळक मुद्देबॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव ड्रग्स केसमध्ये समोर आले आहे.दीपिकाच्या ड्रग्स कनेक्शननंतर आता तिचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटदेखील समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे.

मुंबई - बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव ड्रग्स केसमध्ये समोर आले आहे. दीपिकाच्या ड्रग्स कनेक्शननंतर आता तिचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटदेखील समोर आले आहे. यामुळे आता दीपिकाची अडचण वाढण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनुसार, 'D'चा अर्थ दीपिका पदुकोण आणि 'K'चा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा हे जया साहाच्या असोसिएटचे नाव आहे. 

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

माध्यमांत प्रसिद्ध झालेले दीपिका-करिश्माचे चॅट -

दीपिका : आपल्याकडे माल आहे का?
करिश्मा : आहे पण घरी आहे. मी वांद्र्यात आहे.
करिश्मा : जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते.
दीपिका : हो. प्लीज
करिश्मा : अमितकडे आहे, तो ठेवतो.
दीपिका : Hash ना?
दीपिका : गांजा नाही
करिश्मा : कोकोकडे तू केव्हा येते आहे.
दीपिका : साडे 11 ते 12 च्या दरम्यान

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने सोमवारी सुशांत सिंहची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि ‘टॅलेंट मॅनेजर’ जया साहा यांना संस्थेच्या कार्यालयात हजर राहण्यासं सांगितले होते. अधिकाऱ्याने सांगितले, जया साहा दुपारी दोन वाजन्याच्या सुमारास दक्षिण मुंबई येथील एनसीबीच्या विशेष तपास पथकाच्या (एसआईटी) कार्यालयात आली होती. एनसीबीने मंगळवारीही जया साहाला चौकशीसाठी बोलावले आहे. यात अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

सारासह यांना पाठवण्यात येणार समन -
तपास संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मादक पदार्थांशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भात एनसीबी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांना चौकशीसाठी बोलावणार आहे.

आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात एनसीबीने एक डझनहून अधिक जणांना अटक केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचाही समावेश आहे.

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

English summary :
Drugs case: Deepika Padukone name comes out in Bollywood drug curtail read her drugs chats asks maal aahe ka.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone name comes out in Bollywood drug curtail read her drugs chats asks maal aahe ka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.