bollywood actress kangana ranaut speaks up on it raid at anurag kashyap and taapsee pannu house income tax twitter tweet | अनुराग कश्यप, तापसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; कंगना म्हणाली, "मला पहिल्यापासूनच..."

अनुराग कश्यप, तापसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; कंगना म्हणाली, "मला पहिल्यापासूनच..."

ठळक मुद्देअनुराग कश्यप, तापसीची पुण्यात एका हॉटेलात अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली.त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिगदर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, विकास बहल आदींच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्याची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. आतापर्यंतच्या त्यांच्या कंपनीची मिळकत आणि आर्थिक व्यवहारात कोट्यवधींची अनियमितता आढळून आली. २०११ ते २०१८ या वर्षांतील करचुकवेगिरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनंही उडी घेतली आहे. 

कंगना रणौतनं एका न्यूज पोर्टलच्या बातमीची लिंक शेअर केली आहे. "आयकर विभागानं दावा केलाय की त्यांनी फोनमधील डेटा साफ केला आहे. मनी लाँड्रिंग आणि त्यातील हिस्सा असलेल्या भागीदारीचा आकडा आश्चर्यकारक असून शकतो," असं त्यावर तिनं लिहिलं आहे. "मला पहिल्यापासूनत त्यांच्यावर संशय होता जेव्हा महागड्या राष्ट्रविरोधी जाहिरातींमधून त्यांना प्रवासी मजुरांना चिथावणी देताना पाहिलं होतं," असंही तिनं नमूद केलं आहे. 


"डेटा परत मिळवला जाऊ शकतो. परंतु हे सर्व छोटे खेळाडू आहेत. कोणी केवळ कल्पनाच करून शकतो की या क्षेत्रात दहशतवाद किती आतपर्यंत आपली मुळे रोवून बसला आह आणि पैशासाठी भारताला कशाप्रकारे तोडत आहे. सरकारला सर्वांसाठीच एक चांगलं उदाहरण सादर करावं लागेल. ते दहशतवादासाठी देशाचे तुकडे करून विकू शकत नाहीत, जय हिंद," असही कंगना म्हणाली.

दोन दिवस चौकशी

अनुराग कश्यप व तापसीची पुण्यातील एका हॉटेलात  अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले. आयकर विभागाने बुधवारी मुंबई- पुण्यासह दिल्ली, हैदराबाद आदी विविध ३० ठिकाणी  छापे मारले. त्यामध्ये दोघांसह विकास बहल,  क्वान टलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मधू मंटेना यांच्याही मालमत्तेचा  समावेश आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood actress kangana ranaut speaks up on it raid at anurag kashyap and taapsee pannu house income tax twitter tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.