विराट कोहलीच्याआधी या मॉडेलला डेट करत होती अनुष्का शर्मा, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 04:47 PM2020-03-09T16:47:46+5:302020-03-09T16:48:46+5:30

अनुष्का एका मॉडेलसोबत जवळजवळ दोन वर्षं नात्यात होती असे म्हटले जाते.

Anushka Sharma Date Model Zoheb yusuf Before Virat Kohli PSC | विराट कोहलीच्याआधी या मॉडेलला डेट करत होती अनुष्का शर्मा, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

विराट कोहलीच्याआधी या मॉडेलला डेट करत होती अनुष्का शर्मा, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

ठळक मुद्देझोएब युसुफ हा बंगलुरूमधील एक मॉडेल होता. तो मुळचा मुंबईचा असला तरी तो शिक्षणासाठी उटीमध्ये राहात होता. त्याची आणि अनुष्काची ओळख बंगलूरूमध्ये मॉडलिंगच्या निमित्ताने झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. या कपलने अतिशय साधेपणाने इटलीत लग्न केले.  त्यांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबियातील आणि मित्रमैत्रिणींपैकी खूपच जवळचे लोक उपस्थित होते. विराट आणि अनुष्का यांनी कधीच त्यांचे नाते मीडियापासून लपवून ठेवले नाही. लग्नाच्याआधी देखील विराटसोबत क्रिकेटच्या अनेक टूर्नामेंटला अनुष्का त्याच्यासोबत जात असे. विराट आणि अनुष्का या दोघांनाही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.

अनुष्का आणि विराटला सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. अनुष्का आणि विराट यांच्या नात्याला आता अनेक वर्षं झाली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, अनुष्का आणि विराट यांच्या अफेअरच्या चर्चा मीडियात रंगण्याआधी अनुष्का एका मॉडेलसोबत नात्याच होती. या मॉडेलसोबत अनुष्का जवळजवळ दोन वर्षं नात्यात असल्याचे म्हटले जाते.

अनुष्का शर्मा तिच्या मॉडलिंगच्या काळात बंगलूरूमध्ये राहात होती. त्याच काळात त्या मॉडेलसोबत तिची ओळख झाली होती. मीड डेने दिलेल्या वृत्तानुसार, झोएब युसुफ हा बंगलुरूमधील एक मॉडेल होता. तो मुळचा मुंबईचा असला तरी तो शिक्षणासाठी उटीमध्ये राहात होता. त्याची आणि अनुष्काची ओळख बंगलूरूमध्ये मॉडलिंगच्या निमित्ताने झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघे जवळजवळ दोन वर्षं नात्यात होते. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमध्ये भाग्य आजमवण्यासाठी ते दोघे एकत्र मुंबईत आले होते. अनुष्काला यश राज बॅनरच्या चित्रपटातून ब्रेक मिळाला आणि तिच्या करियरला दिशा मिळाली तर दुसरीकडे झोएबला बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात देखील करत आली नाही. त्यामुळे त्याने कंटाळून मुंबई सोडून बंगलुरूला पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला. अनुष्का आणि झोएब वेगवेगळ्या शहरात राहात असल्याने त्यांनी या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये न राहाता ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता असे म्हटले जाते.

अनुष्का आणि झोएब यांचे ब्रेकअप होऊन अनेक वर्षं झाले असले तरी ते दोघे आजही एकमेकांचे फ्रेंड्स आहेत असे म्हटले जाते. 

Web Title: Anushka Sharma Date Model Zoheb yusuf Before Virat Kohli PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.