गंजो की महफिल में आपका स्वागत...! अनुपम खेर यांनी घेतली कपिल देव यांची मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:57 AM2020-04-22T10:57:01+5:302020-04-22T11:00:07+5:30

कपिल देव यांचा नवा लूक पाहून सगळेच अवाक्

anupam kher welcomes kapil dev in the group of baldies-ram | गंजो की महफिल में आपका स्वागत...! अनुपम खेर यांनी घेतली कपिल देव यांची मजा

गंजो की महफिल में आपका स्वागत...! अनुपम खेर यांनी घेतली कपिल देव यांची मजा

googlenewsNext
ठळक मुद्दे नेटकरीही कपिल देव यांच्या या नव्या लूकवर फिदा झाले आहेत. 

लॉकडाऊनदरम्यान सगळे काही बंद आहे. 3 मे पर्यंत भारतात हीच स्थिती असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू मिळत असल्या तरी काही गोष्टींमुळे मात्र लोक नक्कीच वैतागले आहेत. यातलीच एक म्हणजे, वाढलेले केस. होय, न्हाव्याची दुकाने, सलून बंद असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. दिग्गज ऑलराऊंडर आणि 1983 मध्ये विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार राहिलेले कपिल देव यांचीही अशीच पंचाईत झाली. मग काय, त्यांनी थेट केसांचे मुंडण केले. त्यांचा नवा लूक पाहून सगळेच अवाक् झाले. कपिल देव यांनी आपल्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच, अभिनेते अनुपम खेर त्यांची मजा घेताना दिसले.

कपिल देव यांचा हेड शेव्ड फोटो पाहून अनुपम स्वत:ला रोखू शकले नाहीत. कपिल देव यांना टॅग करत, त्यांनी मजेदार कमेंट लिहिली. ‘माझे मित्र कपिल देव सुद्धा टकलू झालेत.  फॅशनच्या दुनियेत याला ‘शेव्ड’ म्हटले जाते. मी नेहमी म्हणत आलोय की, या जगात दोन प्रकारचे पुरूष आहेत. एक म्हणजे टकलू आणि भविष्यातील टकलू. क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे सर... गंजो की महफिल में आपका ‘बालों रहित’ स्वागत है,’ असे अनुपम यांनी लिहिले.
तूर्तास कपिल देव यांच्या नव्या लूकचा फोटो आणि त्यावरची अनुपम खेर यांचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस
 नेटकरीही कपिल देव यांच्या या नव्या लूकवर फिदा झाले आहेत. अनेकांनी मजेशीर कमेंट दिल्या आहेत. काहींनी कपिल देव यांची तुलना थेट बाहुबलीतील कटप्पाशी केली आहे तर काहींनी त्यांची तुलना ‘वेलकम’ चित्रपटातील फिरोज खान यांच्याशी केली आहे.

Web Title: anupam kher welcomes kapil dev in the group of baldies-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.