इतना अॅटिट्यूड किस बात का? अक्षय कुमारचं ‘ते’ वागणं चाहत्यांना खटकलं, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:06 IST2021-09-06T16:05:49+5:302021-09-06T16:06:21+5:30
अक्षय चाहत्यांना फार निराश करत नाही. पण अलीकडे असं काही घडलं की, अक्षयचं वागणं चाहत्यांना चांगलंच खटकलं.

इतना अॅटिट्यूड किस बात का? अक्षय कुमारचं ‘ते’ वागणं चाहत्यांना खटकलं, पाहा व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजे बॉलिवूडचा सर्वात बिझी स्टार. त्याचे चाहतेही असंख्य. म्हणूनच अक्की दिसला रे दिसला की त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. अक्कीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. तसा अक्षय चाहत्यांना फार निराश करत नाही. पण अलीकडे असं काही घडलं की, अक्षयचं वागणं चाहत्यांना चांगलंच खटकलं.
अक्षयला समोर पाहून एक चाहती इतकी क्रेजी झाली की, त्याच्या जवळ जाण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. घटना आहे मुंबई एअरपोर्टची. नुकताच अक्षय लंडनवरून मुंबईल परतला. मुंबई एअरपोर्टवर त्याला पाहून एक चाहती समोर आली. मी तुझी खूप मोठी चाहती आहे, असे ती अक्षय जवळ येऊन म्हणाली. पण या चाहतीला जवळ येताना पाहून अक्षय किंचीत मागे सरकला आणि नंतर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आपल्या गाडीत बसून निघून गेला. यावेळी अक्षयची टीमही हजर होती.
ही संपूर्ण घटना पापाराझींच्या कॅमेºयात कैद झाली. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि मग काय, अक्षयच्या या व्हिडीओवर जणू कमेंट्सचा पाऊस पडला. अक्कीचा अॅटिट्यूड अनेकांना आवडला नाही. अशांनी या व्हिडीओवर काहीशा संतप्त प्रतिक्रिया दिल्यात.
‘इतका अॅटिट्यूड कशाचा?’ असं एका युजरने लिहिलं. फालतू अॅटिट्यूड, असं अन्य एकानं लिहिलं. आधी तर हा असा वागायचा नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. मी पहिल्यांदा अक्षयला असं वागताना पाहिलं. खूप दु:ख होतंय, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच त्याचा ‘बेनबॉटम’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच अक्षय रक्षाबंधन, सूर्यवंशी, बच्चन पांडे, रामसेतू या सिनेमात तो दिसणार आहे.