After kangana ranaut soft porn star comment Ram Gopal Varma came in support of Urmila Matondkar | कंगनाने 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटल्यावर, उर्मिला मातोंडकरसाठी धावून आला राम गोपाल वर्मा

कंगनाने 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटल्यावर, उर्मिला मातोंडकरसाठी धावून आला राम गोपाल वर्मा

संपूर्ण बॉलिवूडला ड्रग अ‍ॅडिक्ट म्हटल्यानंतर उर्मिला मातोंडकरने कंगना रणौतला चांगले सुनावले होते. त्यानंतर कंगनाने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटलं. कंगनाच्या वक्तव्याची बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी निंदा केली. आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या सपोर्टमध्ये समोर आलाय. त्याने एक ट्विट करून उर्मिलाचं कौतुक केलंय.

राम गोपाल वर्माने लिहिले की, 'मी कुणाच्या चुकीच्या शब्दांची बरोबरी करणार नाही. माझं असं मत आहे की, उर्मिला मातोंडकरने रंगीला, सत्या, कौन, भूत, एक हसीना थी सारख्या सिनेमांमध्ये कॉम्प्लेक्स रोल करून आपलं व्हर्सटाइल टॅलेंट खूप जास्त सिद्ध केलं आहे.

काय म्हणाली होती कंगना?

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरवर पलटवार करत म्हणाली की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले.

उर्मिला मातोंडकरने साधला कंगनावर निशाणा

कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यानंतर तिला खूप विरोध झाला होता. याशिवाय कंगनाने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये असे कित्येक लोक आहेत जे ड्रग्सचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या विधानांवर उर्मिला मातोंडकरने कंगनाला चांगलेच सुनावले. उर्मिला म्हणाली की, संपूर्ण देश ड्रग्स समस्याने पीडित आहे. काय कंगनाला माहित नाही आहे की हिमाचल ड्रग्सचा गड आहे? तिला ही लढाई आपल्या गृह राज्यातून सुरू केली पाहिजे.

Urmila Matondkar hits back Kangna Ranaut via Shivaji Maharaj, Swara Bhasker lends support | उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

मुंबईबद्दल अपमानास्पद वक्तव्य खपवून घेणार नाही - उर्मिला

उर्मिला पुढे म्हणाली होती की, या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, याचा पैसा कोण देतं. तुमच्या आमच्यासारखा टॅक्स पेयर माणूसचं तिच्या सुरक्षेचा खर्च उचलतोय. पोलिसांना ड्रग्स नेक्ससबद्दल का सांगत नाही? या गोष्टीत कोणतीही शंका नाही की मुंबई आणि बॉलिवूड सर्वांचे आहे. ज्याने या शहरावर प्रेम केले आहे आणि त्याला काहीतरी दिले आहे तर हे शहर त्यांचे आहे. या शहराची मुलगी असल्याच्या नात्याने त्याचा अपमानास्पद कोणतेही विधान ऐकून घेणार नाही. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे टीका करता तेव्हा हे शहरच नाही तर तुम्ही इथल्या लोकांचा अपमान करत आहात. उर्मिला पुढे म्हणाली की, जर कुणी प्रत्येक वेळेला ओरडतोय तर ते गरजेचे नाही की तो खरे बोलतो आहे.

उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

ऊर्मिला मातोंडकर ही तर ‘सॉफ्ट पोर्न स्टार’; कंगनाचे पुन्हा बेलगाम वक्तव्य, नव्या वादाची शक्यता

BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After kangana ranaut soft porn star comment Ram Gopal Varma came in support of Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.