Urmila Matondkar is a 'soft porn star'; Kangana's unbridled statement again, the possibility of a new argument | ऊर्मिला मातोंडकर ही तर ‘सॉफ्ट पोर्न स्टार’; कंगनाचे पुन्हा बेलगाम वक्तव्य, नव्या वादाची शक्यता

ऊर्मिला मातोंडकर ही तर ‘सॉफ्ट पोर्न स्टार’; कंगनाचे पुन्हा बेलगाम वक्तव्य, नव्या वादाची शक्यता

मुंबई : वादग्रस्त अभिनेत्री कंगना रानौत हिने ऊर्मिला मातोंडकर हिचा उल्लेख ‘सॉफ्ट पोर्न स्टार’ असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्याला ऊर्मिलाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून जोरदार आक्षेप घेतला आहे.

बॉलिवूडमधील ९९ टक्के मंडळींना अमली पदार्थांचे व्यसन आहे या कंगनाने काढलेल्या उद्गारांचा ऊर्मिलाने मुलाखतीत निषेध केला होता. व्यसनाधीन लोकांची नावे कंगनाने उघड करावीत, असेही ऊर्मिलाने म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना कंगना हिने ऊर्मिलाला सॉफ्ट पोर्न स्टार म्हटले. ऊर्मिलाने मुलाखतीत रूदाली, वैश्या अशा शब्दात माझी संभावना केली तेव्हा हे खोटे महिलावादी लोक कुठे होते, असा सवाल कंगनाने केला. शिवाय, सनी लिओनीला बॉलीवूड जगताने आणि देशाने एक कलाकार म्हणून स्वीकारले आहे. मग, आता पॉर्न स्टार हा शब्द अपमानकारक कसा काय बनला, याचे उत्तर तथाकथित पुरोगाम्यांनी द्यायला हवे, अशा शब्दात कंगनाने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

अभिनेत्री स्वरा भास्करने ‘राष्ट्रवादी’ असा उल्लेख करत केलेल्या आरोपावरही कंगनाने नामोल्लेख न करता उत्तर दिले. मी एक क्षत्रिय आहे. मुंडके छाटले तरी वाजणार नाही. देशाच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उचलेन. मानसन्मानाने जगते आणि अभिमानाने राष्ट्रवादी बनून जगणार. ना कधी तत्त्वांशी तडजोड केली ना भविष्यात करेन, असे ट्विट कंगनाने केले. कंगनाच्या समर्थनार्थ तिची बहीण रंगोली हीही या वादात उतरली आहे. रंगोलीने उर्मिला मातोंडकर हिची काही जुनी छायाचित्रे व एक तिच्यावर लिहिण्यात आलेला एक लेख झळकविला. त्या लेखात उर्मिलाचा उल्लेख ‘सेक्स सिम्बॉल’ असा आहे. त्याचा संदर्भ देऊन रंगोलीने म्हटले आहे की, सेक्स सिम्बॉल म्हणून ओळख करून दिली जाणारी एक जुनीजाणती अभिनेत्री एका युवा अभिनेत्रीच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहे.

माझ्या कार्यालयात बेकायदा बांधकाम झाले आहे, असे कारण देत मुंबई महापालिकेने ते बांधकाम पाडण्याची केलेली कारवाई म्हणजे माझी स्वप्ने, आत्मसन्मान व भविष्यावर केलेला बलात्कारच आहे. महापालिकेने माझ्या मंदिराचे कब्रस्तान केले आहे असेही टिष्ट्वट कंगनाने केले आहे. ‘एक उम्र बीत जाती है घर बनाने में और तुम आह भी नहीं करते बस्तियाँ जलाने में’ असेही कंगनाने मुंबई महापालिकेला उद्देशून म्हटले आहे. बेकायदा बांधकाम तोडण्याच्या कारवाईमुळे कंगनाने २ कोटी रुपयांची भरपाई मिळावी म्हणून महापालिकेविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला आहे.

पूजाने केली उर्मिलाची तारीफ
कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पोर्न स्टार म्हणताच पूजा भट्टने उर्मिला यांची तारीफ केली आहे. उर्मिला उद्देशून तिने म्हटले आहे की, तुम्ही दिग्गज कलाकार आहात आणि तुम्ही स्वत:ची प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. तुमच्या रंगीला चित्रपटातील भूमिका अद्वितीय अशीच होती.

पार्ट्यांमध्ये ड्रग्ज वाटतात
दिग्दर्शक विक्रम भट यांनी मात्र बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर होतो. एका ट्रेमध्ये वेगवेगळे अमली पदार्थ ठेवून ते सर्वांपुढे आणले जातात.

...तर नाव बदलेन - ऊर्मिला
कंगनाच्या पोर्न स्टार या विधानावर उर्मिला मातोंडकर म्हणाली की, दुसऱ्याचा बदला घेण्याची भावना स्वत:लाच संपवून टाकते. बदला घेण्याच्या भावनेला केवळ संयमच आवर घालू शकतो. मी कंगनावर व्यक्तिगत टीका केली नाही किंवा भाजपच्या तिकिटासाठी ती असे करत असल्याचेही कुठे म्हटले नाही. मी कंगनावर भाजपच्या संदर्भाने टीका केल्याचे कोणी दाखवून दिल्यास नाव बदलेन, असे आव्हान उर्मिला मातोंडकरने दिले.
उर्मिला मांतोडकरने कंगनाच्या भाषेवर आक्षेप घेतला. महाराष्ट्र आणि देशात कोरोनासारखे संकट असताना आपण कोणत्या विषयांवर चर्चा करत आहोत. शिवाय, कंगनाने माझा जो उल्लेख केला तो अगदीच खालच्या पातळीचा आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाबाबत काही अपशब्द वापरले होते तेव्हा देशभर गदारोळ माजला. महिला आयोगाच्या प्रमुखांसह अनेकजण तावातावाने पुढे आले. आता कंगनाने त्यापेक्षाही खालची भाषा वापरली तेव्हा हे सगळे कुठे लपून बसले आहेत. नव्या प्रकारचा महिलावाद देशात जन्माला आल्याची टीका उर्मिला मातोंडकरने केली.

जया Vs जया
अभिनेत्री जयाप्रदा यांनी या वाढत उडी घेत जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या की, बॉलिवूडमधील घाण दूर करा, हे रवी किशन यांचे विधान योग्य आहे. त्याचा जया बच्चन यांना राग का यावा. जुने मित्र अमर सिंग आजारी असताना अमिताभ यांनी त्यांना भेटण्याचेही सौजन्य दाखवले नाही. त्या काळात ते जाहिरातींचे चित्रीकरण करीत राहिले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Urmila Matondkar is a 'soft porn star'; Kangana's unbridled statement again, the possibility of a new argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.