राजस्थानला जाण्यासाठी एकाने मागितली कार, सोनू सूदचं उत्तर वाचून हसून लोटपोट झाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 10:20 IST2020-08-20T10:05:58+5:302020-08-20T10:20:24+5:30

आता सोनू सर्वांची मदत करत आहे म्हटल्यावर काही लोक भलतीच मदत मागतात. ही मदत सोनूही पूर्ण करू शकत नाही.

Actor Sonu Sood funny reply to user who ask for car | राजस्थानला जाण्यासाठी एकाने मागितली कार, सोनू सूदचं उत्तर वाचून हसून लोटपोट झाले लोक!

राजस्थानला जाण्यासाठी एकाने मागितली कार, सोनू सूदचं उत्तर वाचून हसून लोटपोट झाले लोक!

अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात हजारो लोकांची वेगवेगळ्या प्रकारे मदत केली.  प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यापासून ते परदेशातून विद्यार्थ्यांना परत आणण्यापर्यंत अनेक कामे सोनूने केली. सोनूने केवळ लोकांची  मदतच केली नाही तर त्याच्या या मदतीने या कठिण काळात अनेकांना हिंमतही मिळाली. आता सोनू सर्वांची मदत करत आहे म्हटल्यावर काही लोक भलतीच मदत मागतात. ही मदत सोनूही पूर्ण करू शकत नाही.

सोशल मीडियावर एका यूजरने सोनू सूदला एक गाडी मागितली. यूजर म्हणाला होता की, त्याला पत्नीच्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी राजस्थानला जायचं आहे. यूजर जोर देऊन म्हणाला की, तो स्वत: गाडी चालवत जाईल. आता सोनूने यूजरच्या या मागणीवर मजेदार उत्तर दिलंय. सोनूने ट्विटला रिप्लाय देत लिहिले की, 'अरे स्वत: का ड्राइव्ह करतो, मीच सोडून देतो ना तुला. मला हेही सांग गाडी कोणती आवडेल आणि त्यात एसीचं टेम्प्रेचर किती असावं हेही सांग'.

आता सोनूने इतकं मजेदार उत्तर दिल्यावर लोकांनाही हसू फुटलंय. असं  नाही की, सोनूकडे पहिल्यांदाच अशी वेगळी मदत मागितली गेली आणि सोनूने पहिल्यांदाच असं मजेदार उत्तर दिलंय. याआधीही सोनूने अनेक यूर्जना अशीच मजेदार उत्तरे देऊन लोकांना हसायला भाग पाडलंय. 

तसा सोनू सूदकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन गेल्या तीन महिन्यात पूर्ण बदलला आहे. रूपेरी पडद्यावर व्हिलन साकारणारा सोनू सूद रिअल लाइफमध्ये अनेकांसाठी सुपरहिरो ठरला आहे. अनेकांसाठी तो मसिहा ठरला आहे. अनेकांना त्याने रोजगार दिला, अनेकांची आर्थिक मदत केली. आता तर तो आदिवासी लोकांचीही मदत करतो आहे.

हे पण वाचा :

पुराच्या पाण्यात घर गेले अन् पुस्तकही; ढसाढसा रडणाऱ्या मुलीला सोनू सूद म्हणाला, ताई अश्रू पूस! आता...

सुशांत प्रकरण CBI कडे; आता मुंबई पोलिसांत ठपका कुणावर?... आयुक्त, तपास अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

Web Title: Actor Sonu Sood funny reply to user who ask for car