'These' biopic viewers will love the audience! | ‘या’ महान व्यक्तींवरच्या बायोपिक्स प्रेक्षकांना आवडतील!
‘या’ महान व्यक्तींवरच्या बायोपिक्स प्रेक्षकांना आवडतील!

 सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आलाय. बॉक्स आॅफिसवरही या बायोपिक चांगलाच गल्ला जमवत असल्याचे दिसून येते आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘संजू’. आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यात एक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ‘संघर्ष’. हा संघर्ष पडद्यावर उमटवणं हा जणू काही आता निर्माते-दिग्दर्शक मंडळींचा ‘धंदा’च बनला आहे. यातली चांगली बाब अशी की, संघर्ष करणाऱ्या लोकांचे चरित्र सिनेमाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. आत्तापर्यंत अनेक बायोपिक्स झाल्या असतील तरीही काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्या बायोपिक प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला नक्कीच आवडतील. तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत, अशा व्यक्तिंचा खजिना...!

* योगेंद्र सिंग यादव
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. ते सर्वांत लहान व्यक्ती आहेत ज्यांना हा सन्मान मिळतो आहे. १९९९च्या कारगिलच्या युद्धात त्यांना १४ बंदुकीच्या गोळया लागलेल्या असतानाही त्यांनी टायगर हिलला पोहोचून ८ सैनिकांचा खात्मा केला.

* गौरी लंकेश
 कन्नडा विकलीच्या ‘लंकेश पत्रिके’च्या संपादिका गौरी लंकेश या मुक्त पत्रकार होत्या. त्यांच्या लिखानावर आक्षेप घेऊन त्यांना काही गटांतर्फे गोळया घालण्यात आल्या. त्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक संस्थांनी प्रयत्न केला. 

* पी.व्ही.सिंधू
भारताची पहिली महिला जिने आॅलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले, एक चित्रपट करायचा असल्यास एवढीच गोष्ट पुरेशी नाही काय? तिने ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१८’ मध्ये महिलांच्या एकेरीमध्ये सिल्व्हर जिंकले होते. वयाच्या १७व्या वर्षीच तिने बीडब्ल्यूएफच्या वर्ल्ड रँकिंगच्या टॉप २० मध्ये जागा मिळवली. 

* अरूंधती रॉय
रॉय या फक्त एक प्रथितयश लेखिका असण्यासोबतच त्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. मानवाचे पर्यावरणाच्या बाबतीत कर्तव्ये हा विषय त्यांनी अनेकदा उचलून धरला आहे.  मानवाच्या दैनंदिन प्रक्रियेत अंतर्भूत करणारी त्यांची मानसिकता त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिली.

* सुशील कुमार
सुशील कुमार या कुस्तीपटूने वैयक्तिकरित्या भारतासाठी आॅलिम्पिकमध्ये दोनदा मेडल्स मिळवले आहेत. मात्र, त्याचे आयुष्य हे खूप संघर्षाने भरलेले आहे. त्याची फॅमिली त्याला या दोन्ही गोष्टी मिळवून देण्यासाठी असमर्थ होती. त्याच्या भावानेही कुस्ती करायला सुरूवात केली. त्यांना खूप कमी निधी यासाठी मिळायचा. 

*  बरूण बिस्वास
पश्चिम बंगालमधील सुतिया या गावात काही स्थानिक गँग्स लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी महिलांवर बलात्कार करायचे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकदा गावाच्या मुख्य ठिकाणी जमाव जमला. तेव्हा बरूणने भाषण करत गावातील लोकांना परिस्थितीची जाणीव करून दिली. तेव्हा त्या गँगमधील लोकांनी त्याला गोळया झाडून ठार मारले. पण, तो एक निडर कार्यकर्ता होता. त्याच्या आयुष्यावर एक बायोपिक नक्कीच बनू शकते.


Web Title:  'These' biopic viewers will love the audience!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.