आजचे राशीभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४: व्यापार सौदे लाभदायक ठरतील, 'या' राशींसाठी दिवस लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:28 AM2024-02-13T07:28:11+5:302024-02-13T07:54:18+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Today's Horoscope, 13 February 2024: Business deals will be profitable, day is heavy for 'Ya' zodiac signs. | आजचे राशीभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४: व्यापार सौदे लाभदायक ठरतील, 'या' राशींसाठी दिवस लय भारी

आजचे राशीभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४: व्यापार सौदे लाभदायक ठरतील, 'या' राशींसाठी दिवस लय भारी

मेष- आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

वृषभ- आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र रास बदलून 13 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. आणखी वाचा

कर्क- आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. आणखी वाचा

सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा

कन्या- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. आणखी वाचा

तूळ- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा

वृश्चिक- आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

धनु- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आणखी वाचा

मकर- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ- आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट - संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 13 February 2024: Business deals will be profitable, day is heavy for 'Ya' zodiac signs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app