आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:46 IST2026-01-15T06:36:40+5:302026-01-15T06:46:34+5:30
Today Daily Horoscope 15 january 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
मेष: आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. जपून राहावे लागेल. आणखी वाचा
वृषभ: आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील. भागीदारीत लाभ व सार्वजनिक जीवनात मान-सन्मान मिळतील. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. कामात यश मिळेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण मात्र वाढेल. विनाकारण संताप व्यक्त केल्यास आपले काम बिघडण्याची शक्यता आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
कर्क: आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. एखादी मानहानी संभवते. प्रवासात अडचणी येतील. आणखी वाचा
सिंह: आज मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल. आईशी मतभेद होतील. सरकारी व मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. आणखी वाचा
कन्या: आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा
तूळ: आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातमी समजेल. प्रवास सुखद होतील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस कष्टदायक आहे. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. सावध राहा. अधिक खर्च झाल्याने पैशाची चणचण भासेल. आणखी वाचा
मकर: मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. घरात एखादे मांगलिक कार्य होईल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. आणखी वाचा
मीन: आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा
