आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 06:51 AM2024-05-02T06:51:13+5:302024-05-02T06:53:38+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - May 2, 2024; Good day for business, financial matters will go well | आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील

आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील

मेष -  02 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल.  आणखी वाचा  

 

वृषभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

 

मिथुन  - आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपार नंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल.  आणखी वाचा 

 

कर्क  -  आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढतील. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा  

 

सिंह - आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. आणखी वाचा 

 

कन्या -    आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील.  आणखी वाचा 

 

तूळ  - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

 

वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी - व्यवसायात यशप्राप्ती होणे अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणे पिणे होईल. आणखी वाचा 

 

धनु - आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा   

 

मकर -  आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळे निराशा वाढेल. आणखी वाचा

 

कुंभ - आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा 

 

मीन -  आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल. व्यापार - व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - May 2, 2024; Good day for business, financial matters will go well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app