आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 07:37 IST2026-01-08T07:30:01+5:302026-01-08T07:37:51+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 8 January 2026 | आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल

आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल


मेष - आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. वैचारिक बदल संभवतो. आणखी वाचा

कर्क - आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. आणखी वाचा 

सिंह - आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. आणखी वाचा

कन्या - आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. भिन्नलिंगी मित्रांशी झालेली भेट आनंददायी ठरेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

धनु - आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. आणखी वाचा

मकर - आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल: गुरुवार, 8 जनवरी, 2026 - ज्योतिषीय भविष्यवाणियाँ

Web Summary : 8 जनवरी, 2026 का राशिफल विविध अनुभवों का संकेत देता है। मेष: क्रोध पर नियंत्रण रखें। वृषभ: पारिवारिक सहयोग। मिथुन: नए उद्यमों को समर्थन। कर्क: नकारात्मकता से बचें। सिंह: आत्मविश्वास बढ़ेगा। कन्या: संघर्षों का प्रबंधन करें। तुला: लाभ की उम्मीद। वृश्चिक: करियर में सफलता। धनु: स्वास्थ्य संबंधी चिंताएँ। मकर: अप्रत्याशित खर्च। कुंभ: प्रेम के अवसर। मीन: अनुकूल दिन।

Web Title : Daily Horoscope: Thursday, January 8, 2026 - Astrological Predictions

Web Summary : January 8, 2026, horoscopes indicate varied experiences. Aries: control temper. Taurus: family support. Gemini: new ventures favored. Cancer: avoid negativity. Leo: confidence soars. Virgo: manage conflicts. Libra: gains expected. Scorpio: career success. Sagittarius: health concerns. Capricorn: unexpected expenses. Aquarius: romantic opportunities. Pisces: favorable day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.