Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२३, विविध क्षेत्रात लाभ संभवतात, परदेश गमनाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 07:46 IST2023-04-30T07:46:15+5:302023-04-30T07:46:49+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope, April 30, 2023, benefits are possible in various fields. Opportunity to travel abroad | Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२३, विविध क्षेत्रात लाभ संभवतात, परदेश गमनाची संधी

Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२३, विविध क्षेत्रात लाभ संभवतात, परदेश गमनाची संधी

मेष:  आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल.  आणखी वाचा 

वृषभ:    आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात.  आणखी वाचा 

मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. आणखी वाचा    

कर्क:   आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

सिंह:  आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल.  आणखी वाचा 

कन्या:  आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील.  आणखी वाचा

तूळ:   आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. एखादा प्रवास घडेल.  आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा 

धनु:  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा 

मकर:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल.  आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा 

मीन:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope, April 30, 2023, benefits are possible in various fields. Opportunity to travel abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app